रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:48 IST

अमरावतीत इंजिनिअर मुलाने आईची हत्या केल्याचा आरोप; संशयित मृतदेहाजवळच बसून होता

नवसारी रिंग रोड परिसरातील अपार्टमेंटमध्ये ६५ वर्षांच्या आईचा गळा आवळून खून झाला; संशयित आरोपी मुलाला गाडगे नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अमरावतीत इंजिनिअर मुलाने आईची हत्या केल्याचा आरोप; संशयित मृतदेहाजवळच बसून होता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अमरावती शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. इंजिनिअर असलेल्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरातील नवसारी रिंग रोड परिसरात असलेल्या गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये हा प्रकार उघडकीस आला. तिथे 65 वर्षांच्या आईचा तिच्याच मुलाने गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचं नाव रंजना सतीश कानफाडे असं असून, संशयित आरोपी असलेल्या मुलाचं नाव तुषार सतीश कानफाडे असं आहे.

संशयित आरोपी तुषार हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या तो वर्क फ्रॉम होम म्हणून घरीच राहून काम करत होता. त्या फ्लॅटमध्ये आई आणि मुलगा हे दोघंच राहत असल्याचीही माहिती आहे.

गाडगे नगर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आई खोटं बोलत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हे कारण पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात सांगितलं आहे, तर अंतिम कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर तुषार हा घटनास्थळीच, मृत आईच्या बाजूला खुर्चीवर बसून होता, अशी माहितीही पुढे आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हत्येमागचं नेमकं कारण काय, याचा पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत. या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, खामगाव शहरात झोपडपट्टी दादांचं वाढतं प्रमाण, दादागिरी, अवैध धंदे आणि सशस्त्र खुनी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. काल शंकरनगर परिसरात झालेल्या खुनी हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. यातील आरोपी अद्याप अटक झालेले नसताना शंकर नगरच्या रहिवाशांनी रात्री एका धार्मिक स्थळी बैठक बोलावली आणि यावर उपाययोजना काय कराव्यात, याबद्दल चर्चा सुरू केली.

बैठक सुरू असताना शंकर नगरमधीलच एकाने दादागिरी करत शस्त्र दाखवून नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि शेकडो महिलांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठलं. शंकर नगर परिसरातील आणि शहरातील अवैध धंदे बंद करा, झोपडपट्टी दादांचा कायमचा बंदोबस्त करा आणि शहरात पोलिसांची गस्त वाढवा, या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने महिला आणि पुरुषांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ