उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला, दोन्ही बंधूंमध्ये दोन तास चर्चा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज यांच्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा सुरू आहे. ही भेट कशासाठी झाली आणि तिथे काय बोलणे झाले, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे कुटुंबासह राज यांच्या घरी पोहोचले. ठाकरे कुटुंबातील ही भेट कौटुंबिक जिव्हाळ्याची तर आहेच, पण तिला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.
उद्धव ठाकरे दोन तासांपेक्षा जास्त वेळ शिवतीर्थवर होते. या काळात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली. आगामी राजकीय समीकरणांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. याचे दूरगामी परिणाम काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी जुलै २०२५ मध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या भेटीगाठी सुरूच असल्याचे दिसत आहे. कधी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले, तर कधी उद्धव ठाकरे राज यांच्या निवासस्थानी आले.
सध्या राज्यात एसआयआरचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना ठाकरे गटाने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा वेळी दोन्ही बंधूंची झालेली ही दोन तासांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रींच्या वाढदिवसाचे निमित्त असले, तरी या भेटीत विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.