सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 09:22 IST

एल प्रभाग समितीच्या निवडीत आमदार दिलीप लांडे यांच्या मुलाचा पराभव, शिंदे गटाला धक्का

मुंबई महापालिकेच्या एल प्रभाग समितीवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीत प्रणव लांडे यांच्यासह दोघांचा मतदानात पराभव झाला. शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजपनेही विरोध केला.

एल प्रभाग समितीच्या निवडीत आमदार दिलीप लांडे यांच्या मुलाचा पराभव, शिंदे गटाला धक्का छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना हा धक्का बसला असून, मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील अशासकीय सदस्यांच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एल प्रभाग समितीवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महायुतीतील भाजपनेही या निवडीला विरोध केल्याचे दिसले.

पालिकेच्या एल विभागातील या निवड प्रक्रियेला शिवसेनेच्या दोन सदस्यांसह भाजपच्या नगरसेवकांनीही विरोध केला. या मतदानात आमदार दिलीप मामा लांडे यांचा मुलगा प्रणव लांडे याच्यासह आणखी दोघांचा पराभव झाला. एल प्रभाग समितीवर अशासकीय आणि संस्थांच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासाठी एकूण १७ अर्ज आले होते. त्यापैकी १४ अर्जांमध्ये त्रुटी असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले, ते पाहू. मुंबई महापालिकेत 26 प्रभाग आहेत. त्यातील एल वॉर्डच्या समितीत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तीन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करायची होती. या पदासाठी 8 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर एल वॉर्डला 17 अर्ज मिळाले. या अर्जांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रणव लांडे याच्यासह फक्त तिघेच पात्र ठरले.

या तिघांच्या नियुक्तीचा प्रस्ताव एल वॉर्ड प्रभाग समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र समितीतील काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मग प्रभाग समितीचे अध्यक्ष, सेनेचे विजेंद्र शिंदे यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

बैठकीत 13 सदस्यांपैकी 9 सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. फक्त दोघांनी प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला, तर दोघे जण तटस्थ राहिले. मतदानात ११ सदस्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ९ जणांनी विरोधात आणि २ जणांनी बाजूने मतदान केले. त्यामुळे आमदारपुत्रासह दोघांची नियुक्ती प्रक्रिया थांबली.

शिवसेनेचे किरण लांडगे आणि मीनल तुरडे यांनी या निवड प्रक्रियेला विरोध केला आहे. शिवसेनेच्या दोन सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. त्यातच भाजपचे हरीश भांदिर्गे यांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने महायुतीमधील मतभेदही उघड झाले आहेत. प्रणव लांडे यांच्यासह आणखी दोघांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे एल प्रभाग समितीतील ही निवड प्रक्रिया राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ