१०,००० mAh बॅटरीचा Vivo S2 FE भारतात विक्रीसाठी उपलब्ध, खरेदीवर खास ऑफर्स
टेक कंपनी विवोने काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केलेल्या Vivo S2 FE या स्मार्टफोनची विक्री २० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टेक कंपनी विवोने काही दिवसांपूर्वी भारतात Vivo S2 FE हा नवा स्मार्टफोन लाँच केला होता. आजपासून, म्हणजेच २० ऑक्टोबरपासून, या फोनची विक्री सुरू झाली आहे. १०,००० mAh बॅटरीसह आलेला हा फोन आता ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट, अमेझॉन, विवो इंडियाची वेबसाईट आणि निवडक रिटेल स्टोअर्समधून हा फोन घेता येईल. कंपनी या फोनच्या खरेदीवर काही खास ऑफर्स देत आहे. या ऑफर्समुळे फोनची किंमत कमी होणार आहे आणि नवा फोन घेताना ग्राहकांना बचत करण्याची संधीही मिळणार आहे.
किमतीचा विचार केला तर Vivo S2 FE दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांत मिळतो. ६GB + १२८GB व्हेरिअंटची किंमत ३८,९९९ रुपये आहे, तर ८GB + १२८GB व्हेरिअंटची किंमत ४२,९९९ रुपये आहे. स्टेलर ग्रीन, टायटन ब्लॅक आणि झेन व्हाइट या तीन रंगांत हा फोन मिळतो.
लाँच ऑफरअंतर्गत फोनच्या खरेदीवर १० टक्के इंस्टंट कॅशबॅक किंवा १० टक्के एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. याशिवाय १००GB गूगल वन स्टोरेज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिले जात आहे. फोनसाठीच्या 'व्ही-शील्ड' स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शनवर ४० टक्क्यांपर्यंत सवलतही उपलब्ध आहे.
आता फीचर्सकडे वळूया. फोनमध्ये ६.८३ इंच १.५K अमोलेड डिस्प्ले आहे. त्याला १२०Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आहे आणि एचबीएममध्ये २,००० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००e 5G चिपसेट असून ८GB पर्यंत रॅम आणि १२८GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
बॅटरीबद्दल सांगायचे तर, ४४W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह १०,००० mAh बॅटरी या फोनमध्ये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी ६८ तासांपर्यंतचा कॉलिंग वेळ आणि ३० तासांपर्यंतचा टिकटॉक व्हिडिओ प्लेबॅक वेळ देऊ शकते.
उष्णता नीट बाहेर जावी, म्हणजेच हिट मॅनेजमेंट अधिक चांगले व्हावे, यासाठी फोनमध्ये ३,८०० वर्ग मिलीमीटरची वेपर चेंबर कूलिंग सिस्टिम दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, वायफाय, ब्लूटूथ ५.४ आणि यूएसबी टाइप-सी हे पर्याय मिळणार आहेत.
कॅमेऱ्याच्या बाबतीत फोनमध्ये ५०MP चा सोनी IMX852 प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत २MP चा Bokeh सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग आहे.