मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:10 IST

ऐन सणासुदीत ऑनलाइन विक्री थंडावली, डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी घट

अमेज़न आणि फ्लिपकार्टच्या सेलच्या पहिल्या 10 दिवसांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाइन डिलिव्हरी डिस्पॅच कमी झाले असून स्मार्टफोन व इलेक्ट्रॉनिक्सच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसला आहे.

ऐन सणासुदीत ऑनलाइन विक्री थंडावली, डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी घट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी दिल्ली : भारतात सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बाजारपेठांना बसला आहे आणि ऑनलाइन शॉपिंगही मंदावली आहे. अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' हे सणासुदीतले मोठे सेल असतात. या सेलच्या पहिल्या 10 दिवसांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाइन डिलिव्हरी डिस्पॅचमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी घट झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि घरगुती उपकरणे या विभागांमध्ये मागणी कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांत या उत्पादनांच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि हेच त्यामागचे मुख्य कारण आहे. खर्च वाढला आणि नफा कमी झाला, म्हणून ब्रँड मोठ्या सवलती देऊ शकत नाहीत. येत्या काही दिवसांत मागणी वाढली नाही, तर ई-कॉमर्स क्षेत्रासाठी हा सणासुदीचा हंगाम अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत ठरू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीला जोरदार खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र ऑनलाइन सणासुदीची विक्रीही थंडावलेली दिसत आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या आणि डायरेक्ट-टू-कन्झ्युमर ब्रँड्स यांच्या मते, सेलच्या पहिल्या चार दिवसांत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे एकूण व्यापार मूल्य सुमारे 29800 ते 30900 कोटी होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 33200 कोटी होते. त्या तुलनेत यंदाचे मूल्य वार्षिक आधारावर 7 ते 10 टक्क्यांनी कमी आहे.

उद्योग क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या श्रेणींचा वाटा साधारणपणे एकूण जीएमव्हीच्या निम्म्याहून अधिक असतो. अशा वेळी याच प्रमुख श्रेणींच्या किमती वाढल्याने संपूर्ण ई-कॉमर्स उद्योगाचा वेग मंदावत आहे.

प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या आणि डायरेक्ट-टू-कन्झ्युमर ब्रँड्स सांगतात की, किमती वाढल्या आणि डिस्काउंट मर्यादित राहिले, त्यामुळे ग्राहकांचा ओढा कमी झाला आहे. फ्रेट चार्ज वाढला असून iPhone, Samsung, Vivo, Oppo आणि Xiaomi यांचे सरासरी दर आता 35000-37000 झाले आहेत. सणासुदीत खरेदीची अपेक्षा असतानाच ग्राहक हात आखडता घेताना दिसत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ