मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:21 IST

चार्जिंग करताना या चुका टाळा, नाहीतर फोनचा USB Type-C पोर्ट बिघडू शकतो

घाईघाईत फोन चार्जिंगला लावताना नकळत होणाऱ्या चार चुकांमुळे USB Type-C पोर्ट खराब होऊ शकतो आणि दुरुस्तीचा खर्च अंगावर येऊ शकतो.

चार्जिंग करताना या चुका टाळा, नाहीतर फोनचा USB Type-C पोर्ट बिघडू शकतो छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्क्यांपेक्षा खाली गेली की आपण घाईघाईत फोन चार्जिंगला लावतो. पण या घाईत आपल्याकडून नकळतपणे काही चुका होतात आणि त्यामुळे फोनचा USB Type-C पोर्ट खराब होऊ शकतो. पोर्ट बिघडला तर तो दुरुस्त करण्यासाठी खर्च करावा लागू शकतो, किंवा फोन सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावा लागू शकतो.

मुळात हा पोर्ट फक्त चार्जिंगपुरता नसतो. डेटा ट्रान्सफरसारख्या इतर कामांसाठीही तो महत्त्वाचा आहे. म्हणूनच तो खराब झाला तर तुमची अनेक कामं अडकू शकतात. मग हा पोर्ट कोणकोणत्या कारणांमुळे खराब होऊ शकतो, ते आता एकेक करून पाहूया.

पहिली चूक म्हणजे केबल जोर लावून लावणे. फोन चार्ज करताना केबल चुकीच्या पद्धतीने किंवा जोराने जोडली, तर पोर्टमधला कनेक्टर खराब किंवा डॅमेज होऊ शकतो. USB Type-C कनेक्टर दोन्ही बाजूंनी फोनमध्ये जोडता येतो, त्यामुळे तो लावायला जोर लावण्याची गरजच नसते. केबल नीट बसली नाही, तर ती फोनमधून काढा आणि पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करा.

दुसरी चूक म्हणजे पोर्टमध्ये धूळ आणि घाण साचू देणे. मोबाईल खिशात, बॅगेत किंवा धूळ असलेल्या जागी ठेवला, तर पोर्टमध्ये धूळ किंवा छोटे कण साचू शकतात. मग चार्जिंग केबल नीट बसत नाही आणि मोबाईल वारंवार चार्जिंगमधून डिस्कनेक्ट होऊ शकतो. पोर्ट साफ करण्यासाठी कोणतीही टोकदार वस्तू वापरू नका. गरज वाटली तर तज्ज्ञांकडून पोर्ट साफ करून घ्या.

तिसरी चूक म्हणजे फोन चार्जिंगला लावून तो वापरणे. चार्जिंग सुरू असताना फोन वापरला, तर केबलवर दबाव पडू शकतो. तुम्ही फोन सारखा हलवत असाल किंवा केबल वाकडी होत असेल, तर हा दबाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे फक्त पोर्टच नाही, तर केबलचे कनेक्शनही खराब होऊ शकते. म्हणून चार्जिंग सुरू असताना केबल सरळ राहील आणि कनेक्टरवर दबाव पडणार नाही, याची नेहमी काळजी घ्या.

चौथी चूक म्हणजे ओल्या पोर्टमध्ये चार्जर लावणे. मोबाईलमध्ये ओलावा किंवा पाणी असेल, तर चार्जिंग केबल जोडणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पोर्टमध्ये गंज लागण्याचा किंवा इलेक्ट्रिकल डॅमेजचा धोका जास्त वाढू शकतो. म्हणून पोर्ट ओला असेल तर चार्जर लावणं टाळा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ