विवो V80 FE लवकरच बाजारात, BIS च्या वेबसाईटवर V2624 मॉडेल नंबरसह दिसला नवा फोन
विवो कंपनी आपल्या V80 सीरीजमधील आणखी एक स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Vivo V80 FE हा फोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर दिसला आहे.
स्मार्टफोन आणि टेक कंपनी विवो आपल्या V80 सीरीजमधील आणखी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. Vivo V80 FE हा कंपनीचा आगामी फोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टेंडर्ड (BIS) च्या वेबसाईटवर V2624 या मॉडेल नंबरसह दिसला आहे. या फोनची किंमत बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये असणार आहे.
कंपनीने याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात आपला नवा Vivo V80 स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा एक नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
हाच फोन याआधी इंडोनेशियाच्या SDPPI या सर्टिफिकेशन साइटवरही दिसला होता. तिथे V2624 मॉडेल नंबर असलेला हा फोन V80 FE या नावाने लिस्ट करण्यात आला आहे. मात्र या सर्टिफिकेशनमध्ये विवोच्या या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विवोनेही अजून अधिकृतपणे कोणतीच घोषणा केलेली नाही. तरीही हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष कंपनीच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
आता विवो V80 बद्दल. या फोनच्या 8 जीबी आणि 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 62,999 रुपये आहे, तर 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Zeiss कॅमेरा दिला आहे. त्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे. फोनमध्ये 1.5K रेजोल्यूशनचा 144Hz अमोलेड डिस्प्ले आणि 7,200mAh बॅटरी आहे. हा फोन 90W चार्जिंगला सपोर्ट करतो.
याच मालिकेतील आधीच्या फोनबद्दल सांगायचे तर, कंपनीने गेल्या वर्षी विवो V70 FE लाँच केला होता. त्यामध्ये 6.83-इंच 1.5K 120Hz अमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो चिपसेट, 200MP मुख्य कॅमेरा, 7,000mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. त्याची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली होती, पण नंतर कंपनीने ती वाढवून 44,999 रुपये केली.