विवोचा नवा Vivo Y600s Pro चीनमध्ये लाँच, 10,200mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग
विवोने चीनमध्ये Y600 सिरीजमधला नवा Vivo Y600s Pro लाँच केला आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y600s Pro लाँच केला आहे. कंपनीने अलीकडेच Y600i आणि Y600k Turbo हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने त्यांच्या Y600 सिरीजसाठी आणखी एक नवे स्मार्टफोन मॉडेल आणले आहे. या फोनची खास बाब म्हणजे यामध्ये 10,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोनची किंमत मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये आहे.
किमतीबद्दल सांगायचे तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 आहे, म्हणजेच सुमारे 39,000 रुपये. तर 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 आहे, म्हणजेच सुमारे 43,300 रुपये. हा स्मार्टफोन मूनलाइट ब्लॅक, फ्लोटिंग गोल्ड, स्टारी पर्पल आणि वास्ट ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो. यात डुअल नॅनो-सिम कार्ड्स वापरता येतात आणि 5G कनेक्टिव्हिटीलाही सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.83-इंच 1.5K (2,800x1,260 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, एचडीआर आणि P3 वाइड कलर गॅमटला सपोर्ट करतो.
परफॉर्मंससाठी फोनमध्ये 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e चिपसेट मिळणार आहे. त्याला 8GB एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज जोडण्यात आले आहे. मेमोरी फ्यूजन फीचरमुळे या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत अतिरिक्त वर्चुअल रॅम सपोर्टही मिळणार आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर फोनच्या मागच्या बाजूला f/1.8 अपर्चरचा 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला f/2.45 अपर्चरचा 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनचे हे दोन्ही कॅमेरे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, बेईडौ, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. याशिवाय स्टीरियो स्पीकर्स, इन्फ्रारेड (IR) रिमोट कंट्रोल, फेस रिकग्निशन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर यांसारखे इतर फीचर्सही या फोनमध्ये मिळणार आहेत.
बॅटरीचा विचार केला तर विवो Y600s Pro मध्ये 10,200mAh बॅटरी देण्यात आली असून ती 90W वायर्ड चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह येते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे.