बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:32 IST

मोबाईल क्रमांक ५ रुपयांत, आधार ८०० रुपयांपर्यंत: सायबर फसवणुकीपासून सावध राहा

नागरिकांची ओळख सांगणारे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि छायाचित्रे सायबर विश्वात विकली जात आहेत. फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, ते जाणून घ्या.

बदलत्या तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. स्मार्टफोनमध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे आपली अनेक कामे अगदी चुटकीसरशी होत आहेत. मात्र वाढत्या डिजिटल धोक्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सतत चिंता असते.

याचे कारण म्हणजे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक करत असतात. ते लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशा परिस्थितीत नागरिकांची एक छोटी चूकही महागात पडू शकते. त्यामुळे डिजिटल जगात कोणतेही पाऊल उचलताना सावध राहणे अत्यंत गरजेचे असते.

डिजिटल वापर वाढत असताना त्यासोबतचे धोकेही वाढत आहेत. नागरिकांची ओळख सांगणारे मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि छायाचित्रे सायबर विश्वात विकली जात आहेत. विमा आणि कर्जविक्री करणाऱ्या कंपन्यांपासून सायबर गुन्हेगारांपर्यंत अनेकजण ही माहिती खरेदी करून नागरिकांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक नुकसान करत आहेत. मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अवघ्या ५ रुपयांना, तर पडताळणी केलेला आधार क्रमांक ५०० ते ८०० रुपयांना तृतीय पक्षाच्या एजंटकडून खरेदी केला जात असल्याचे तपासात आढळले.

मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीसोबत नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र जोडले गेले, तर सायबर भामटे बँक, डिजिटल वॉलेट, विमा आणि इतर सेवांच्या केवायसी प्रक्रियेत फसवणूक करू शकतात. तसेच सिमकार्डची अदलाबदल करून किंवा विश्वासार्ह वाटणारे फोन करूनही ते नागरिकांना गंडा घालू शकतात.

कर्ज, विमा, चलन, केवायसी, परतावा किंवा सरकारी योजनांच्या नावाने पाठवलेल्या लिंकद्वारे नागरिकांचे ओटीपी आणि बँक खात्याची माहितीही चोरली जाते.

सायबर सुरक्षा विभागाने आधारचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आहे. अलीकडे आधार अद्ययावत करताना, सरकारी योजनांसाठी अर्ज करताना किंवा सिमकार्ड खरेदी करताना तृतीय पक्षाच्या एजंटकडून आधारचा गैरवापर करून गुन्हे केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर कोणतेही ॲप्स अधिकृत प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा. तसेच कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, लोकेशन, मेसेजेस, मायक्रोफोन आणि कॅमेरा यांना अनावश्यक परवानग्या देणे टाळा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ