बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

फोनमध्ये अचानक जाहिराती दिसू लागल्या? धोक्याचा संकेत असू शकतो, आत्ताच तपासा सेटिंग

ॲप ओपन न करता फुल स्क्रीन जाहिरात दिसणे हा धोक्याचा संकेत असू शकतो. संशयास्पद ॲप, ब्राऊझर नोटिफिकेशन किंवा ॲडवेअरमुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.

फोनमध्ये अचानक जाहिराती दिसू लागल्या? धोक्याचा संकेत असू शकतो, आत्ताच तपासा सेटिंग छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

स्मार्टफोन वापरताना होम स्क्रीनवर कोणताही ॲप ओपन न करता फुल स्क्रीन जाहिरात दिसू लागली, तर तो धोक्याचा संकेत असू शकतो. एखादे संशयास्पद ॲप, ब्राऊझर नोटिफिकेशन किंवा ॲडवेअर यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी मोबाईलमधील ॲप्स आणि सेटिंग तपासणे गरजेचे आहे. स्क्रीनवर सतत जाहिराती येत असतील आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर सावध राहायला हवे.

तुम्ही फोनमध्ये कोणताही ॲप उघडला नसतानाही स्क्रीनवर जाहिराती येत असतील, तर काही ॲप्स इंस्टॉल केल्यानंतर अशी समस्या दिसू शकते. त्यामुळे नुकताच एखादा ॲप डाऊनलोड केला असेल आणि त्यानंतर हा त्रास सुरू झाला असेल, तर तो ॲप लगेच फोनमधून डिलीट करा. त्यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करायला विसरू नका.

काही वेबसाईट्स आणि ॲप्स नोटिफिकेशनमधून वारंवार जाहिराती पाठवतात. मोबाईलच्या नोटिफिकेशन पॅनलमध्ये अनोळखी ऑफर्स आणि जाहिराती वारंवार येत असतील, तर सर्वात आधी त्या नोटिफिकेशन कोणत्या ॲप्सवरून येत आहेत, ते शोधा. मग त्या ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन बंद करा.

फोनच्या होम स्क्रीनवर जाहिराती वारंवार दिसत असतील, तर फोनमधील संशयास्पद ॲप्स किंवा थर्ड पार्टी लाँचर तपासा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन अलीकडेच इंस्टॉल केलेले ॲप्स पाहा आणि संशयास्पद वाटणारे ॲप्स डिलीट करा.

फोनचा ब्राउझर आपोआप उघडू लागला किंवा अनोळखी वेबसाइट्सवर रीडायरेक्ट होत असेल, तर ब्राउझरच्या साइट सेटिंग्ज आणि नोटिफिकेशन परवानग्या तपासा. अनोळखी वेबसाइट्ससाठी दिलेल्या परवानग्या तात्काळ रद्द करा आणि ब्राउझिंग डेटा साफ करा. कोणत्याही संशयास्पद पॉप-अपवर क्लिक करू नका.

जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात आधी अलीकडे इंस्टॉल केलेले संशयास्पद ॲप्स डिलीट करा. गूगल प्ले स्टोअरमधून प्ले प्रोटेक्ट स्कॅन करा आणि फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. कोणत्याही अनोळखी वेबसाईटवरून एपीके फाईल डाऊनलोड करू नका. संशयास्पद ॲप्सना फक्त आवश्यक तेवढ्याच परवानग्या द्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ