कराळे मास्तर गेम फिरवणार? नागपूर पदवीधरमध्ये भाजप, काँग्रेसचं टेन्शन वाढलं
नागपूर पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर भाजपचे सुधाकर कोहळे फक्त ४००० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे अभिजीत वंजारी दुसऱ्या, तर नितेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. राजकीय वर्तुळात या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तीन ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे आहेत, तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावंडे आघाडीवर आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किरन सरनाई पुढे आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सतिश चव्हाण पिछाडीवर आहेत.
नागपूर पदवीधर मतदारसंघात मात्र वेगळाच ट्विस्ट दिसतो आहे. इथे पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपचे सुधाकर कोहळे सध्या आघाडीवर आहेत. पण त्यांची आघाडी अवघ्या ४००० मतांचीच आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अभिजीत वंजारी आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर नितेश कराळे आहेत. तिघा उमेदवारांमधल्या मतांचं अंतर फार नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत पहिल्या पसंतीच्या मतांवरच इथला निकाल लागण्याची शक्यता कमी दिसते. हा निकाल कदाचित दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीपर्यंत जाऊ शकतो.
याच संदर्भात कराळे मास्तरांनी आधीच दावा केला आहे की दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मतं त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर ठरला, तर भाजप आणि काँग्रेस या दोघांचं टेन्शन वाढू शकतं.
मतमोजणी अजून सुरूच असल्याने निकालाबद्दल कोणताही निश्चित अंदाज बांधता येत नाही. पण कराळे मास्तरांनी भाजप आणि काँग्रेस दोघांचं टेन्शन वाढवलं आहे, एवढं मात्र नक्की. सध्या भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत, पण त्यांची आघाडी फार मोठी नाही. त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.