लालबागचा राजा आणि बिग एफएमच्या सहयोगाची १८ वर्षे पूर्ण; यंदा स्टुडिओ थेट लालबागमध्ये
बिग एफएमने 'लालबागचा राजा'सोबतच्या सहयोगाची १८ वर्षे पूर्ण करत यंदाच्या गणेशोत्सवातील मोहिमेचा समारोप केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई : बिग एफएमने 'लालबागचा राजा'सोबतच्या सहयोगाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने या वर्षीच्या गणेशोत्सवातील आपल्या मोहिमेचा समारोप झाला. थेट प्रक्षेपण, खऱ्या गोष्टी आणि डिजिटल माध्यमातून लोकांशी जोडले जाणे, या तिन्ही गोष्टींतून या एफएम केंद्राने आपला नेहमीचा स्टुडिओ उत्सवाच्या अगदी मध्यभागी आणला.
यंदाच्या उत्सवाला उबेरचा पाठिंबा होता. त्यामुळे बिग एफएमच्या 'लालबागचा राजा' मोहिमेला उबेरच्या मोबिलिटी सेवेची जोड मिळाली. उबेर आणि सिट्रोएन या दोघींचा ड्रायव्हिंग पार्टनर म्हणून समावेश झाला आणि त्यांनी प्रत्यक्ष जागेवरील अनुभवात आरामाची भर घातली.
दहा दिवस चाललेल्या या उत्सवात उबेरने आपल्या सर्व मोबिलिटी फ्लीटमध्ये वापरकर्त्यांसाठी पहिल्यांदाच पहिली राईड मोफत हा उपक्रम राबवला. या सहयोगातून १० विजेत्यांना लालबागचा राजाच्या विशेष व्हीआयपी दर्शनाची संधीही मिळाली. बिग एफएमचे रेडिओ आणि सोशल प्लॅटफॉर्म तसेच उबेरची जागेवरील उपस्थिती यांच्या जोरावर हा उपक्रम पुढे नेण्यात आला. त्यात ब्रँडेड टचपॉइंट्स आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वेटिंग लाउंज यांचा समावेश होता.
सिट्रोएनच्या जागेवरील उपस्थितीत कार शोकेस आणि मसाज चेअर्स असलेला खास कम्फर्ट झोन होता. दर्शनानंतर भाविकांना विश्रांती घेता यावी, यासाठी तिथे जागा करून देण्यात आली.
यंदाच्या उपक्रमाच्या केंद्रस्थानी होते ते बिग एफएमच्या लाइव्ह स्टुडिओचे लालबागला झालेले स्थलांतर. त्यामुळे हे केंद्र लोकांच्या अधिक जवळ आले आणि उत्सवाला आकार देणारे क्षण टिपता आले. या स्टुडिओतून थेट आरती कव्हरेज, मूर्तीचे अनावरण, सेलिब्रिटी आणि भक्तांशी गप्पा, उत्सवाचे अपडेट्स आणि विसर्जन कव्हरेज हे खास आकर्षण होते. ज्यांना लालबागपर्यंत येता आले नाही, त्यांच्यापर्यंत हा अनुभव बिग एफएमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने पोहोचवला.
करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रकाश जोग, विशाल-शेखर जोडीतील शेखर रावजियानी, 'हनुमान अंश'ची संगीत टीम आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी बिग एफएमच्या स्टुडिओला भेट दिली. बाप्पाशी जोडलेल्या उत्सवातील आपल्या आठवणी आणि अनुभव त्यांनी इथे सांगितले.
लालबागच्या राजाच्या मूर्तीकारांच्या कथेचा शोध घेणारी 'मूर्ती मेकर ऑफ लालबाग' ही रेडिओ माहितीपट मालिका यंदाच्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग ठरली. गप्पा, आसमंतातील आवाज आणि खऱ्या कथांमधून या मालिकेने, पिढ्यान् पिढ्या मुंबईच्या उत्सवाचे केंद्र बनलेल्या मूर्तीमागील कारागिरी आणि भक्ती यांच्यावर प्रकाश टाकला. 'हुमन्स ऑफ लालबाग' हाही यंदाच्या कार्यक्रमाचा भाग होता. त्यात भक्त, स्वयंसेवक, विक्रेते आणि कुटुंबांकडे मायक्रोफोन वळवून, लालबागच्या राजाला सगळ्यांसाठी इतका जवळचा उत्सव बनवणारे वैयक्तिक अनुभव टिपण्यात आले.
रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेडचे सीईओ अशित कुकियन म्हणाले, "यावर्षी आम्हाला केवळ दृश्यांच्या पलीकडे जाऊन उत्सवाचा आत्मा असणाऱ्या कहाण्या मांडायच्या होत्या - मूर्ती बनवणारे लोक, दरवर्षी येणारे भाविक, कुटुंबाच्या आठवणी आणि बदलत्या मुंबईतही स्थान टिकवून असणाऱ्या परंपरा सांगायच्या होत्या. यातच रेडिओची एक अनोखी भूमिका असते, यावर आमचा विश्वास आहे."
हे १८ वे वर्ष संपत असताना, 'लालबागचा राजा'शी बिग एफएमच्या सहकार्यातून उत्सवाला ओळख देणाऱ्या कथा, आवाज आणि भावना यांच्यासाठी एक जागा तयार होत आहे. 'लालबागचा राजा'चा मूळ रेडिओ भागीदार म्हणून सुमारे दोन दशकांत तयार झालेले नाते त्यातून अधिक घट्ट होत आहे.