सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

कुकरमध्ये बनवा बेकरीसारखी खुसखुशीत नानकटाई, दिवाळीसाठी सोपी रेसिपी

ओव्हन किंवा एअर फ्रायरशिवाय घरच्या घरी कुकरमध्ये बेकरीस्टाईल नानकटाई कशी करायची, ते जाणून घ्या.

कुकरमध्ये बनवा बेकरीसारखी खुसखुशीत नानकटाई, दिवाळीसाठी सोपी रेसिपी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. सणावारांच्या दिवसांत घरोघरी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. त्यात नानकटाई सगळ्यांच्या आवडीची आहे. हा पारंपरिक भारतीय कुकीजचा प्रकार अतिशय लोकप्रिय असून अनेकांच्या घरी आवर्जून बनवला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नानकटाई खायला खूप आवडते.

ओव्हन किंवा एअर फ्रायरशिवाय नानकटाई होत नाही, असे सगळ्यांना नेहमीच वाटते. पण घरच्या घरी कुकरमध्येसुद्धा बेकरीसारखी परफेक्ट नानकटाई करता येते. तोंडात टाकताच विरघळणारी ही नानकटाई एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. ओव्हन किंवा एअर फ्रायरऐवजी कुकरमध्ये ती झटपट तयार होते. त्यामुळे ही रेसिपी कशी करायची, ते आता पाहूया.

साहित्य असे लागेल: तूप, पिठीसाखर, वेलची पावडर, मैदा, बेसन, रवा, बेकिंग पावडर, बारीक केलेले पिस्ते, मीठ आणि अर्थातच कुकर.

सुरुवातीला ताटात सगळीकडे तूप पसरवून घ्या. ते सेट होण्यासाठी ताट फ्रीजमध्ये ठेवा. थंड झालेले तूप एका मोठ्या वाटीत काढा. त्यात पिठीसाखर आणि वेलची पावडर घालून व्हिस्करने फेटा. मिश्रण मऊ, हलके आणि क्रिमी होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करा.

या क्रिमी मिश्रणात मैदा, बेसन, रवा आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा. सगळे साहित्य हलक्या हाताने एकत्र करून पिठाचा मऊ गोळा बनवा. मळलेले पीठ १० मिनिटे फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवा.

त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्यावर दाब द्या आणि वरून सजावटीसाठी पिस्ते व सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या लावा. अशा प्रकारे नानकटाई बेकिंगसाठी तयार होईल.

आता कुकरच्या तळाशी मीठ पसरवा, त्यावर स्टँड ठेवा आणि रबर व शिट्टी काढून झाकण बंद करा. कुकर स्लो गॅसवर १० मिनिटे प्रीहीट होऊ द्या.

तूप लावलेल्या प्लेटवर किंवा बेकिंग ट्रेवर नानकटाई ठेवा. कुकरचे झाकण लावून मंद आचेवर १५ ते २० मिनिटे बेक होऊ द्या. खालचा भाग हलका सोनेरी झाला की नानकटाई बाहेर काढा. अशा सोप्या पद्धतीने बनवलेल्या बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाईचे घरातला प्रत्येक जण कौतुक करेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ