कॉर्टेवाच्या #2MillionWomen उपक्रमाची दोन वर्षे; ६.३७ लाखांहून अधिक महिलांपर्यंत पोहोच
सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या #2MillionWomen उपक्रमाने 22 राज्यांतील 7 लाख 95 हजारांहून अधिक लोकांपर्यंत मजल मारली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कॉर्टेवा अॅग्रीसायन्सने सुरू केलेल्या #2MillionWomen या उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. महिला समृद्ध झाल्या तर शेती क्षेत्रही समृद्ध होते, या विश्वासातून हा उपक्रम सुरू झाला. ग्रामीण भारतातील महिला आता आपल्या उपजीविकेची साधने अधिक भक्कम करत आहेत, शेतीच्या आधुनिक आणि सुधारित पद्धती अवलंबत आहेत, नवे व्यवसाय सुरू करत आहेत आणि नेतृत्वाच्या भूमिकेत पुढे येऊन आपल्या समुदायात बदल घडवत आहेत.
हा उपक्रम सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झाला. 2030 पर्यंत भारतातील कृषी क्षेत्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीत महिलांना सक्षम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी, उद्योजक आणि समुदायाच्या नेत्या म्हणून यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्ये, ज्ञान आणि संधी महिलांना मिळवून देण्यावर त्याचा भर आहे. कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवण्यावर लक्ष देणाऱ्या मोठ्या कॉर्पोरेट उपक्रमांपैकी हा पहिल्या उपक्रमांमध्ये होता.
गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी अशी आहे. देशातील 22 राज्यांमध्ये 7 लाख 95 हजारांहून अधिक लोकांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचला आहे आणि त्यात 6 लाख 37 हजारांहून अधिक महिला आहेत. जवळपास 49 हजार महिला आता नेतृत्वाच्या भूमिकेत काम करत आहेत. 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून 1 लाख 54 हजारांहून अधिक लोकांची उपजीविकेची साधने अधिक सक्षम झाली आहेत. तसेच 1 लाख 71 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीवर सुधारित कृषी पद्धती वापरल्या जात आहेत.
मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील महिला अनेक पिढ्यांपासून महुआची फुले गोळा करून ती अगदी कमी दराने विकत होत्या, किंवा त्यापासून स्थानिक देशी दारू तयार करत होत्या. गरिबी आणि सामाजिक कलंक यांच्या चक्रात त्या अडकल्या होत्या. महिलांच्या नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) स्थापन झाल्यावर चित्र बदलले. आता या महिला महुआच्या फुलांवर प्रक्रिया करून पौष्टिक घटकांनी समृद्ध आणि उच्च दर्जाचे 'ट्रायबो महुआ लाडू' तयार करतात. जंगलातून फुले गोळा करणाऱ्या असुरक्षित परिस्थितीतील महिला आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या उद्योजिका झाल्या आहेत.
मध्य प्रदेशातील बांधवगड कृषी वनोपज प्रोड्युसर कंपनीच्या पूनम तिवारी म्हणाल्या, \"महिलांमध्ये नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास निर्माण होणे हा सर्वात मोठा बदल आहे. आता अधिकाधिक महिला निर्णयप्रक्रियेत सहभागी होत आहेत, बाजारपेठांशी जोडल्या जात आहेत आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत. कॉर्टेवाच्या सहकार्यामुळे आमची संघटना अधिक सक्षम झाली असून शेतकरी समुदायांमध्ये आमचा प्रभाव वाढण्यास मदत झाली आहे.\"
लघु शेतकरी कृषी व्यवसाय संघाचे (एसएफएसी), भारत सरकार, माजी व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा म्हणाले, \"भारतीय शेती आणि ग्रामीण विकासात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांना ज्ञान, कौशल्ये आणि संधी दिल्या तर त्यांच्या उपजीविकेत सुधारणा होऊ शकते.\"
समुन्नती फायनान्शियल इंटरमीडिएशन अँड सर्व्हिसेस प्रा. लि. चे सहसंस्थापक श्रीधर ईश्वरन म्हणाले, \"भारतीय शेतीच्या केंद्रस्थानी महिला आहेत.\" कॉर्टेवा अॅग्रीसायन्सचे आशिया-पॅसिफिक (एपीएसी) अध्यक्ष सुब्रतो गीड म्हणाले, \"भारतीय शेतीचा कणा महिलाच राहिल्या आहेत.\" गेल्या दोन वर्षांतील कामगिरीचा अभिमान असल्याचे सांगून त्यांनी बांधिलकी कायम असल्याचे म्हटले. उपक्रम पुढच्या टप्प्यात जात असताना कॉर्टेवा महिलांच्या नेतृत्वाखालील संस्था आणि उपक्रमांना सहकार्य देत राहणार आहे.