सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

कोजागिरी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा, कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना पाठवा हे मराठी संदेश

यंदा 25 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. या शुभ पर्वानिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी काही निवडक मराठी शुभेच्छा संदेश.

कोजागिरी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा, कुटुंबाला आणि मित्रमैत्रिणींना पाठवा हे मराठी संदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

शरद ऋतूत येणारी कोजागिरी पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतला अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. यंदा ही कोजागिरी पौर्णिमा 25 ऑक्टोबर रोजी साजरी होत आहे.

धार्मिक मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण होतो आणि पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. म्हणूनच या रात्रीला वेगळे महत्त्व दिले जाते.

या रात्री उघड्या आकाशाखाली, चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दूध आणि मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. तसेच रात्रभर जागरण करण्याचीही रीत आहे.

कोजागिरी हे नाव 'को जागर्ति?' म्हणजेच 'कोण जागे आहे?' या संस्कृत शब्दावरून आले आहे. अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.

चंद्राचे दर्शन घेत, नवीन आठवणी आणि उत्साहासह हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या शुभ पर्वानिमित्त आपल्या कुटुंबातल्या माणसांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना खास मराठी शुभेच्छा संदेश पाठवले, तर आनंद द्विगुणित होतो.

हे संदेश तुम्ही सगळ्यांना पाठवू शकता किंवा स्टेटसला ठेवू शकता.

चंद्राचा मंद प्रकाश आणि दुधाचा गोड स्वाद तुमच्या आयुष्यात येवो. नात्यामधला विश्वास वाढू दे आणि साखरेसारखा गोडवा टिकू दे. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सौख्य, मांगल्य, धन आणि समृद्धीची बरसात होऊ दे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी भूतलावर येते. जो कोणी जागा असेल, त्यावर संतुष्ट होऊन ती कृपाशीर्वाद देते. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक जावो आणि आनंदाची उधळण करणारा ठरो, हीच सदिच्छा. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याला वंदन करूया, आणि शक्ती, बुद्धी व आरोग्यासाठी दुग्धप्राशन करूया. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा खास आहे. घरोघरी आनंदाची उधळण होवो आणि हा संपूर्ण दिवस सुखकारक जावो, हीच सदिच्छा मनी धरून. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या या चांदण्यात दुधाचा गोडवा पसरू दे आणि घराघरांमध्ये आनंदाचे दिवे उजळू दे. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ