शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

युद्धामुळे काळ्या समुद्रात १ लाख २० हजारांहून जास्त डॉल्फिन व सस्तन प्राणी दगावल्याचा अंदाज

युद्धामुळे काळ्या समुद्रात १ लाख २० हजारांहून जास्त डॉल्फिन व सस्तन प्राणी दगावल्याचा अंदाज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जग PT24 टीम

युक्रेनमधील संशोधकांच्या अंदाजानुसार रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील सागरी जीवसृष्टीला मोठा फटका बसला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा फटका फक्त माणसांनाच बसतोय असे नाही. माणसांचे जीव जातात, रस्ते, पूल, इमारती अशा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतात. पण त्याबरोबरच निसर्गही मोठ्या प्रमाणात नष्ट होतो. माणसांच्या या भांडणात आता काळ्या समुद्रातील सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत.

युक्रेनमधील संशोधकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, युद्धामुळे आतापर्यंत १ लाख २० हजारांहून जास्त डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राणी मरण पावले आहेत. त्यामुळे काळ्या समुद्रातील नैसर्गिक परिसंस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याची किंमत खूप मोठी असून पुढच्या काळात ती माणसालाच चुकवावी लागणार आहे.

डॉल्फिनसाठी रशियन सैन्य वापरत असलेली शक्तिशाली सोनार यंत्रणा, क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण आणि समुद्राखाली होणारे स्फोट घातक ठरत आहेत. डॉल्फिन दिशेचा अंदाज घेण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी प्रतिध्वनीवर आधारित यंत्रणा वापरतात. पण युद्धातल्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या या नैसर्गिक क्षमतेवरच परिणाम होतोय. त्यांना दिशा ओळखणे, एकमेकांशी संपर्क साधणे आणि अन्न शोधणे अवघड होत आहे.

काही डॉल्फिन समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडतात. अनेकांचे मृतदेह मात्र समुद्राच्या तळाशी जातात. त्यामुळे प्रत्यक्षात किती डॉल्फिन मरण पावले, याची मोजदाद करणेही कठीण झाले आहे.

आणखी एक धोका म्हणजे तेलगळती आणि रासायनिक प्रदूषण. युद्ध सुरू असताना अनेक युद्धनौका, तेलवाहू आणि मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे समुद्रात तेल, इंधन आणि इतर रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात सांडले आहेत आणि ही गळती अजूनही सुरू आहे. या प्रदूषणाचा परिणाम समुद्रातील मासे, शिंपले आणि इतर अनेक जलचरांवर होत आहे.

अन्नसाखळी खूपच मौल्यवान असते. ती विस्कळीत झाल्यामुळे संपूर्ण सागरी परिसंस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील पक्ष्यांनाही युद्धातील ड्रोन आणि स्फोटांच्या आवाजाचा फटका बसत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

युक्रेनमधील तुझली लगून्स राष्ट्रीय उद्यानाचे संशोधनप्रमुख इव्हान रुसेव्ह यांच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर डॉल्फिनच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. २०२६ पर्यंत मृत्यूंचा अंदाज १ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. काळ्या समुद्रातील एकूण सागरी सस्तन प्राण्यांच्या संख्येच्या मानाने हा मोठा धक्का असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

युद्ध संपल्यानंतरही ही जीवसृष्टी पूर्वपदावर यायला ३० ते ५० वर्षांचा काळ लागू शकतो. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा पर्यावरणावरचा परिणाम कित्येक दशके टिकून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या युद्धामुळे नैसर्गिक संपत्तीही पणाला लागली आहे.

#नागपूर#दुनिया#PT24#World#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ