सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
08:02 IST

चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 'भीम कन्या संघ'तर्फे अन्नदान, अनुयायांना मसाले भात वाटप

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना 'भीम कन्या संघ' ग्रुपने मसाले भात दिला.

चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 'भीम कन्या संघ'तर्फे अन्नदान, अनुयायांना मसाले भात वाटप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला. 'भीम कन्या संघ' ग्रुपतर्फे दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना मसाले भात वाटण्यात आला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारो अनुयायांनी याचा लाभ घेतला.

या दोन दिवसांत देश-विदेशातून आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या बौद्ध अनुयायांचा अथांग जनसागर चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर उसळला होता. या सोहळ्याचे औचित्य साधून, सामाजिक व धार्मिक भान जपत, ग्रुपने दीक्षाभूमी परिसरात महाप्रसादाचे म्हणजेच मसाले भात वाटपाचे भव्य आयोजन केले होते. हजारो धम्मबांधवांना या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

पंचायत समिती गोंडपिपरीच्या माजी सभापती हर्षा चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या महिला सदस्यांनी दोन्ही दिवस हे काम केले. सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा हेतू होता. दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो अनुयायांना पिण्याचे पाणी आणि जेवणाची सोय व्हावी, म्हणून ग्रुपच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला.

१५ आणि १६ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मसाले भाताचे वाटप अत्यंत शिस्तीत आणि आपुलकीच्या भावनेने झाले. दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी आलेल्या जनसागराने या सेवाभावी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

हा अन्नदानाचा उपक्रम यशस्वी व्हावा, यासाठी पंचायत समिती गोंडपिपरीच्या माजी सभापती हर्षा चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. पौर्णिमा चांदेकर, राजश्री बोंबर्डे, स्मिता तितरे, रीना पाथर्डी, धनश्री गेडाम, सुप्रिया वनकर, अनामिका धोंगडे, पौर्णिमा साव, तसेच वैशाली देठे, रिनू वनकर, कल्पना नगराळे, परिणीता मेश्राम, पुनम नगराळे, पुनम कासवटे, आम्रपाली कांबळे, पौर्णिमा मुन, श्रद्धा दहिवले, सुनिता भसारकर, श्वेता वानखेडे, स्नेहा अलोने, शालू बहादे, रजनी पाझारे, शोभा चंदनखेडे, अर्चना जिखने, रश्मी निमसरकार, निर्मला ठमके, स्निग्धा हस्तक, रिंकू चालपुकर, काजल रायपुरे, पंचाशीला भरणे, शुभांगी गोरगाटे, चंदा बाबणे, वैशाली वनकर, बहिणाबाई अलोने, मिरा बाई चांदेकर आणि भीम कन्या संघ ग्रुपच्या इतर सदस्यांनी या कामात मोलाचे योगदान दिले.

दीक्षाभूमीवर आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून भीम कन्या संघाच्या महिलांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. या सामाजिक आणि सेवेच्या उपक्रमामुळे दीक्षाभूमी परिसरात बंधुभाव आणि समर्पणाचे सुंदर वातावरण तयार झाले होते. सामाजिक बांधिलकी जपत भीम कन्या संघ ग्रुपने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि कौतुकही केले जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ