सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:38 IST

बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन, सरकारला ५ हजारांची भीक

देऊळगावराजा येथे सोमवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भीक मागून जमा केलेली रक्कम तहसीलदारांमार्फत शासनाकडे सुपूर्द केली.

बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भीक मांगो आंदोलन, सरकारला ५ हजारांची भीक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे सोमवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले. शेतकरी नेते रविकांत तुपकर स्वतः या आंदोलनात सहभागी झाले होते, त्यामुळे ते चांगलेच लक्षवेधी ठरले. सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने त्यांची क्रूर थट्टा केली आणि ५ हजार रुपयांची भीक दिली, असे म्हणत आंदोलकांनी "आम्हाला भीक नको, आमच्या घामाचे दाम हवे" अशी भूमिका मांडली.

आंदोलकांनी भीक मागून जमा झालेली रक्कम तहसीलदारांमार्फत शासनाकडे जमा केली. त्यासोबत मागण्यांचे निवेदनही सुपूर्द करण्यात आले. कोणत्याही अटी आणि मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असा गंभीर इशाराही देण्यात आला.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनता दुष्काळ आणि महागाईने होरपळत आहे. अशा वेळी सरकारने भरघोस मदत देण्याऐवजी पाच हजार रुपयांची भीक देऊन थट्टा केली, म्हणून संघटनेचे पदाधिकारी चांगलेच भडकले आहेत, असे आंदोलकांनी सांगितले. त्याचा परिणाम देऊळगावराजा शहरातही दिसून आला.

शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी शहरात भीक मागून निधी जमा केला. ही मदत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत शासनाकडे जमा करण्यात आली. तुपकर यांनी संतप्त सवाल केला की, प्रचंड दुष्काळ असताना कुंभमेळा घेण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारकडे आहेत, कोट्यवधींच्या वाहन खरेदीसाठी पैसे आहेत, मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यांसाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना देण्यासाठीच पैसे नाहीत का?

तुपकर यांनी अशी मागणी केली की, मंत्री, आमदार, खासदार, सचिव आणि जिल्हाधिकारी यांचे ३ महिन्यांचे पगार थांबवावेत, कुंभमेळा रद्द करावा, मंत्र्यांच्या दौऱ्यांवरील खर्च बंद करावा आणि अन्नदात्या शेतकऱ्याला मदत करावी. चारा छावण्यांचे नियोजन डिसेंबरमध्ये न करता आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करावे, छावणीला नको, दावणीला चारा द्यावा, तसेच हेक्टरची मर्यादा न ठेवता हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

या वेळी मधुकर शिंगणे, जुल्फेगार शेठ, सहदेव लाड, प्रदीप हिवाळे, बालाजी सोसे, वसंतराव पाटील, पुरुषोत्तम शिंगणे, देविदास शिंगणे, जिलानी भाई, राजू नागरे, गजानन जायभाये, किसान नागरे, पिंटू डोके, संदीप शिंदे, गणपत शेळके, राजेंद्र शिंगणे आदी शेतकरी उपस्थित होते.

लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभारणार, असा इशारा तुपकर यांनी दिला. शेतकरी सध्या प्रचंड संकटात आहेत, त्यांना आर्थिक मदतीसोबत मानसिक आधार देणे गरजेचे असताना सरकार क्रूर थट्टा करत आहे, असे ते म्हणाले. गावगाड्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला बळीराजाची ताकद दाखवून देऊ, त्याची तयारी सुरू झाली आहे आणि आता लवकरच राज्यभर आक्रमक आंदोलन उभारणार, असे तुपकर यांनी सांगितले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ