सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:35 IST

बुलढाण्यात दुष्काळाची छाया: जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला दिले.

बुलढाण्यात दुष्काळाची छाया: जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन येणाऱ्या काळात जनावरांसाठी लागणारा चारा आणि पिण्याचे पाणी यांचे योग्य नियोजन करा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. राज्य सरकारने बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. पुढच्या काळात दुष्काळाची छाया आणखी गडद होणार असून पाण्याची समस्या निर्माण होणार आहे, असे यात म्हटले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.

पाणीटंचाई आणि चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय नियोजन करत आहे, याची माहिती घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी जाधव बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. चव्हाण, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पशुधन अधिकारी आणि विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील जलप्रकल्पांचे अधिकारीही बैठकीत हजर होते. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करण्यास जाधव यांनी सांगितले.

धरणातील गाळ जेसीबीने शेतकऱ्यांना मोफत काढून द्यावा, तसेच लोकसहभागातून नद्यांचे खोलीकरण करावे, असेही ते म्हणाले. जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश नद्या सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीतून वाहतात. पाण्याच्या प्रवाहासोबत दगडही वाहून येतात आणि ते साचल्याने या नद्या अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

गावातील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळाले पाहिजे, या दृष्टीने गावातील सार्वजनिक विहिरींची साफसफाई करा, असे जाधव यांनी सांगितले. गावांमध्ये उंचीवर पाण्याच्या टाक्या उभारून त्यात सार्वजनिक वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचीही उपाययोजना करावी, असे ते म्हणाले. जल जीवन अंतर्गत खोदलेल्या विहिरींना तत्काळ वीज कनेक्शन द्यावे, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार असलेल्या जाधव यांनी पाणीटंचाईबाबत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील धरणे आणि प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा आणि मृतसाठा यांची योग्य सांगड घालून पिण्याचे पाणी आरक्षित ठेवावे, असे त्यांनी सांगितले. शिल्लक पाणी लक्षात घेता खरिपातील तुरीला एखादे पाणी देता येते का, याची चाचपणी अधिकाऱ्यांनी करावी, असेही ते म्हणाले. शिल्लक पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून तुरीच्या उत्पन्नात घट होणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ