सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

अकोल्यात प्रकल्प, कार्यालय वाशिममध्ये; शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातील बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यांतील दोन धरणांचे कार्यालय वाशिम जिल्ह्यात ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत.

अकोल्यात प्रकल्प, कार्यालय वाशिममध्ये; शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी आणि पातूर या दोन तालुक्यांत महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत दोन धरणे प्रस्तावित आहेत. या धरणांसाठी जागेची मोजणी सध्या सुरू आहे. पण या दोन्ही धरणांचे कार्यालय मात्र वाशिम जिल्ह्यात ठेवण्यात आले आहे, तर हे दोन्ही तालुके अकोला जिल्ह्यातच येतात.

या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी अकोला हे जिल्ह्याचे ठिकाण अगदी जवळ आहे. तरीही पाटबंधारे विभागाने दोन्ही तालुक्यांतील धरणांचे कार्यालय वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या डिव्हिजनला जोडले आहे.

या प्रकारामुळे भूसंपादनातील अडचणींसाठी या शेतकऱ्यांना वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका उभी राहिली आहे.

नदीजोड प्रकल्पामुळे अकोला जिल्ह्याला २८२.३४ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी साठवण्यासाठी धरणे बांधणे गरजेचे आहे. सध्या काटेपूर्णा प्रकल्पाएवढा मोठा प्रकल्प बांधण्यासाठी जिल्ह्यात जागा नाही. मात्र काटेपूर्णा प्रकल्पापेक्षा कमी साठवण असलेले प्रकल्प बांधणे शक्य आहे. म्हणूनच जिल्ह्यात चार धरणे बांधण्याचा प्रस्ताव आहे.

या चार धरणांत सिसा उदेगाव, लोअर काटेपूर्णा, येळवण आणि चिखलगाव यांचा समावेश आहे. या धरणांमधून २०७ दलघमी पाणी साठवता येणार आहे. उरलेले पाणी तीन लघु प्रकल्पांची साठवण क्षमता वाढवून साठवले जाणार आहे.

पिण्याचे पाणी आणि सिंचन हे मोठे प्रश्न आहेत. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा आदी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तीन लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. त्यातून पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचनाचे मोठे प्रश्न सुटणार आहेत.

या नदीजोड प्रकल्पाच्या कालव्यातून सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यासाठी वैनगंगा ते नळगंगापर्यंतच्या ४२६ किमीच्या कॅनॉलचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा तसेच पैनगंगा प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ