गोकुळवरील चार संचालकांच्या नेमणुकीवरून शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी भूमिका, महायुतीत धुसफूस
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमल्यानंतर विरोधकांची टीका सुरू असतानाच आता महायुतीतूनही नाराजीचा सूर उमटला आहे.
गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमले आहेत. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात जोरदार टीका सुरू झाली आहे. विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत, पण आता महायुतीच्या आतूनही या निर्णयावर वेगळा सूर ऐकू येऊ लागला आहे.
विरोधकांकडून टीका होत असतानाच सतेज पाटील यांनीही या नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले. कोल्हापूरकरांनी नाकारले, कोर्टात दिलासा मिळणार नाही, यानंतर मंत्रिमंडळात आदेश काढल्याचे त्यांनी म्हटले. सरकारच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी थेट मोठी घोषणा केली. एवढेच नाही, तर कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्याचीही घोषणा त्यांनी केली. हा मोर्चा 9 तारखेला निघणार आहे.
सतेज पाटील आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. गोकुळवर चार संचालक का नेमले, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सतेज पाटील यांच्याकडे बहुमत असताना सरकारने ही नेमणूक केल्याने सगळी गणितेच बिघडली, असे बोलले जात आहे.
याच मुद्द्यावरून आता महायुतीमधील धुसफूस समोर येत आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्यांच्या निवडीवरून शिवसेना नाराज आहे. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत, त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे थेट म्हणणे आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेने मांडले आहे. त्यामुळे महायुतीतला वाद पुन्हा एकदा पुढे आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा वाद पेटलेला आहे. पदवीधर निवडणुकीवरून हा वाद उफाळून आला होता, आणि आता त्यात गोकुळच्या मुद्द्याची भर पडली आहे.
आता गोकुळच्या निमित्ताने महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली असून, गोकुळमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना स्वीकारले पाहिजे, अशी शिंदे यांची भूमिका आहे. राज्य सरकारने चार संचालक नेमल्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद चांगलाच वाढताना दिसत आहे. यावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राहुल गांधी यांनीही यावर भाष्य केले होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.