गोकुळच्या अध्यक्षपदावरून चार शासकीय सदस्यांबाबत आज निर्णयाची शक्यता, वटहुकुमाची चर्चा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीआधी चार शासकीय सदस्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देणारा वटहुकूम निघण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीपासून सुरू झालेले राजकारण अजूनही थांबायला तयार नाही. निवडणूक होऊन गेली तरी तिथले वातावरण शांत झालेले नाही. आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून नवी हालचाल सुरू झाली आहे. गोकुळवरील चार शासकीय सदस्यांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे. शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार देण्यासाठी वटहुकूम काढला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या निवडणुकीचा प्रचार, मतदान आणि मतमोजणी या तिन्ही टप्प्यांत मोठी चुरस पाहायला मिळाली होती. सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने महायुतीचा 13 विरुद्ध 12 अशा फरकाने पराभव केला होता. म्हणजेच समविचारी पॅनेलचे 13 आणि महायुतीच्या पॅनेलचे 12 संचालक निवडून आले होते. सतेज पाटील यांच्या आघाडीला मिळालेले बहुमत काठावरचे होते. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठे चढउतार दिसत आहेत. या घडामोडी सुरू असतानाच महायुतीकडून एखादा मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.
सध्या लागू असलेल्या सहकार कायद्यानुसार शासकीय सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र सरकार वटहुकूम काढून या शासकीय सदस्यांनाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देऊ शकते, अशी चर्चा आहे. तसे झाले आणि हे चारही शासकीय सदस्य महायुतीच्या विचारांचे असले, तर गोकुळची सत्ता महायुतीच्या ताब्यात जाऊ शकते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरूनही मोठे रंगतदार राजकारण पाहायला मिळेल, असे म्हटले जात आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या पहिल्या सभेपासूनच ही शक्यता बोलून दाखवली जात होती. शासकीय सदस्यांची निवड करायची, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा आणि सत्ता आपल्या बाजूला वळवायची, असा महायुतीचा प्रयत्न होता, असे म्हटले जात आहे. त्या दिशेने आता पावले टाकली जात आहेत, अशी माहिती आहे.
त्यासाठी गोकुळवर चार शासकीय संचालकांची निवड केली जाणार आहे. त्यापैकी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांची आहेत. चौथे नाव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ठरवले जाईल, अशी माहिती आहे. या चारही शासकीय सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने मतदान केले, तर गोकुळची सत्ता महायुतीकडे जाईल.
कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालक लागतात. समविचारी आघाडीकडे एक संचालक कमी आहे आणि त्याचा फायदा महायुतीने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत गोकुळच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.