शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:10 IST

SIR विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर, सोमवारपासून राज्यभर सह्यांची मोहीम

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने SIR विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात सह्यांची मोहीम जाहीर केली आहे.

SIR विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर, सोमवारपासून राज्यभर सह्यांची मोहीम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी देशभरात संतापाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. राजधानी दिल्लीत आधी AISF ने मोठे आंदोलन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्ली दणाणून सोडली.

आज (10 ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतर येथे आंदोलन करणार आहे. मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाची हाक दिली असून, राज्यभर सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगितले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, "सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम करतोय. पुढचा आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आलेली दिसेलच. त्यासाठी आम्हाला जेलमध्ये टाका, वाटेल ते करा. आज जर आवाज उठवला नाही, तर पुढची पिढी विचारेल की लोकशाहीचा गळा घोटला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात?"

ही मोहीम फक्त मुंबईपुरती मर्यादित राहणार नसून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांना विमानातच अटक करण्यात आल्याचा मुद्दा देशपांडे यांनी उपस्थित केला. त्यावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, "अभिजित दीपके याने काय केलंय? मर्डर, रेप काय केलंय? किती दिवस ठेवणार? आज आवाज दाबाल, उद्या पुन्हा आवाज उठवू. किती दिवस आवाज दाबणार?" सरकार आणि पोलिसांना जे करायचे ते त्यांनी करावे, पण मनसे आपली भूमिका सोडणार नाही, असेही देशपांडे यांनी सांगितले.

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हे सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी केलं आहे," असा आरोप सरदेसाई यांनी केला. या प्रक्रियेत घोळ झाल्याचे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचाही उल्लेख केला.

सरदेसाई यांनी सांगितले की, मनसेने यापूर्वी काढलेल्या गर्जना मोर्चानंतरही आंदोलन थांबवलेले नाही. सोमवारची सह्यांची मोहीम हा पहिला टप्पा असेल, आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल.

एकीकडे काँग्रेस SIR विरोधात रस्त्यावर उतरली आहे, तर दुसरीकडे मनसेनेही आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ