सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:38 IST

पांढरे केस मुळापासून काळे करायचे? आवळा आणि मेहेंदीचा हा घरगुती लेप वापरून पाहा

केमिकलच्या हेअर कलरऐवजी आवळा, लिंबू आणि मेहेंदी वापरून केसांना नैसर्गिक काळा रंग देण्याची घरगुती पद्धत.

पांढरे केस मुळापासून काळे करायचे? आवळा आणि मेहेंदीचा हा घरगुती लेप वापरून पाहा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

प्रत्येक महिलेला आपले केस नेहमी चमकदार आणि सुंदर हवे असतात. केस वाढावेत आणि काळेभोर दिसावेत म्हणून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. तरीही राहणीमानात होणारे बदल, मानसिक ताण आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल यांमुळे अगदी तरूण वयातच केस पांढरे होतात. ही समस्या आता खूपच सामान्य झाली आहे.

पांढऱ्या केसांपासून सुटका हवी म्हणून महिला केमिकल असलेले हेअर कलर, डाय, हेअर मास्क, हेअर सीरम असे बरेच प्रकार वापरतात. पण वारंवार हेअर कलर लावल्याने केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस झपाट्याने गळू लागतात. म्हणूनच केसांची काळजी घेताना केमिकल हेअर कलर वापरणे टाळावे.

पांढरे केस साधारणपणे काळे किंवा लाल केले जातात. मेहेंदी लावली की केसांना लालसर रंग येतो. मेहेंदीमधील रासायनिक घटक केसांचा नैसर्गिक दर्जा बिघडवतात, त्यामुळे नुसती मेहेंदी लावण्यापेक्षा नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ केसांसाठी वापरावेत. बाजारातील हानिकारक केमिकल उत्पादने वापरली तर फरक फक्त काही दिवस दिसतो आणि नंतर केस पुन्हा होते तसेच होतात. म्हणून पांढरे केस मुळापासून काळे करायचे असतील तर पुढे सांगितलेल्या पदार्थांचा हेअर मास्क बनवून वापरावा. त्यामुळे केसांचा बिघडलेला दर्जा सुधारायला मदत होईल आणि केस काळेभोर दिसतील.

या घरगुती उपायाची सुरुवात आवळ्यापासून करायची आहे. सुकवलेले किंवा कच्चे आवळे सर्वात आधी ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर आतल्या बिया काढून आवळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात थोड्या पाण्यासह घालून बारीक पेस्ट तयार करा.

ही पेस्ट लोखंडी कढईत ओता आणि कढई झाकून रात्रभर तशीच ठेवा. असे केल्याने आवळ्याचा रंग गडद होण्यास मदत होते. त्यामुळे पांढरे केस मुळांपासून काळे होण्यास मदत होईल आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळेल.

दुसऱ्या दिवशी लोखंडी कढईतील पेस्ट नीट एकत्र करून घ्या. त्यात लिंबू आणि गरजेनुसार कोणतीही चांगली मेहेंदी मिसळा. तयार मिश्रणात अजिबात गुठळ्या राहू नयेत, याची काळजी घ्या.

मेहेंदी लावण्याआधी केस नीट विंचरून घ्यावेत. त्यानंतर तयार केलेली मेहेंदी केसांवर आणि स्कॅल्पवर लावा आणि ३ तास तशीच ठेवा. मेहेंदी लावल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप घालणे फायदेशीर ठरेल. ३ तासांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर पुढच्या दिवशी शाम्पूने केस धुतले की केसांचा रंग काळा झालेला दिसेल.

हा मजकूर फक्त सामान्य माहितीसाठी आहे. यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ