सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:14 IST

गणेश यादव, पंकज विष्णू, ओंकार राऊत यांचा 'संडे १९९६'; ३० ऑक्टोबरला प्रदर्शन

रहस्यमय मराठी चित्रपट 'संडे १९९६'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपट ३० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत हे तिघे कलाकार 'संडे १९९६' या रहस्यमय मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. हा चित्रपट येत्या ३० ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलरमधून गूढ वातावरण, कोकणाची वेगळी पार्श्वभूमी आणि काळाशी जोडलेलं रहस्यमय कथानक समोर आलं आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. व्ही आर. के. फिल्म्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांचं आहे.

कधी काळाचं चक्र उलटं फिरतं, तर कधी भूतकाळ वर्तमानाचा पाठलाग करू लागतो. मग नात्यांचा, भावनांचा आणि अनुत्तरित प्रश्नांचा गुंतागुंतीचा खेळ सुरू होतो. या रहस्यमय वळणांवरच 'संडे १९९६'ची कहाणी उलगडत जाते. भूतकाळ आणि वर्तमान यांच्या सीमारेषेवर अडकलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा प्रवास अनेक अनपेक्षित घटनांनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे.

गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत या तिघांनीही आतापर्यंतच्या कामातून अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. या चित्रपटात ते कोणत्या व्यक्तिरेखांमधून समोर येणार, त्यांच्या भूमिकांचा कथानकाशी नेमका काय संबंध असणार आणि घटनांना कोणतं अनपेक्षित वळण मिळणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता ट्रेलरमुळे आणखी वाढली आहे. या तिघांसह सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी या चित्रपटाबद्दल विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, कथा आणि तिची गूढ मांडणी सुरुवातीपासूनच मला भावली. कोकणाची पार्श्वभूमी, कथानकातील अनपेक्षित वळणं आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

लेखक-दिग्दर्शक जीवन चव्हाण यांनी सांगितलं की, 'संडे १९९६'मध्ये प्रत्येक घटना, प्रत्येक नातं आणि प्रत्येक वळणामागे एक रहस्य दडलं आहे. प्रेक्षकांनी केवळ पडद्यावर घडणाऱ्या घटना पाहू नयेत, तर त्यामागचे धागेदोरे जोडत या गूढ प्रवासाचा भाग व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्येक उत्तरातून नवा प्रश्न निर्माण करणारी आणि शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच एका वेगळ्या अनुभवातून घेऊन जाईल, असंही ते म्हणाले.

कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याला गूढतेची किनार लाभलेल्या या कथेतून रहस्य, भावभावना आणि थरार यांचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ