सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

जेन झी आणि जेन अल्फा माहितीच्या स्फोटात जन्मली, पण ज्ञान नाही: मुख्यमंत्री फडणवीस

नागपूरमधील नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती, मातृभाषा, मोबाईल आणि AI वर भूमिका मांडली.

जेन झी आणि जेन अल्फा माहितीच्या स्फोटात जन्मली, पण ज्ञान नाही: मुख्यमंत्री फडणवीस छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपुरात झालेल्या 'नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदे'च्या समारोपाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आजची मुलं माहितीच्या स्फोटाच्या आणि तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्माला आली आहेत, असं ते यावेळी म्हणाले.

जेन झी (Gen-Z) आणि जेन अल्फा (Gen-Alpha) या पिढ्यांकडे त्यामुळे माहिती भरपूर आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. मात्र त्या माहितीवर आधारित ज्ञान (नॉलेज) त्यांच्याकडे नाही. म्हणूनच या काळातले विद्यार्थी आणि तरुण यांच्याकडे जी माहिती आहे, तिचं ज्ञानात रूपांतर करण्याची जबाबदारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षणाच्या माध्यमाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व विकसित देशांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम मातृभाषेत आहे. याउलट सर्व विकसनशील देशांमध्ये अभ्यासक्रम त्यांच्यावर राज्य करून गेलेल्या देशाच्या भाषेत आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणूनच मातृभाषेत शिक्षण देण्यावर भर देते, असं त्यांनी सांगितलं. पाच वर्षांपर्यंत मुलांचा मानसिक विकास तीव्र गतीने होतो. त्या काळात मातृभाषेत मुलांशी होणारी बातचीत त्यांच्या मानसिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते, असंही फडणवीस म्हणाले.

सोशल मीडियाबद्दल त्यांनी वेगळा मुद्दा मांडला. आजचा विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतला आहे, असं सगळेजण बोलतात. पण आपण सगळेही तेवढेच मोबाईलमध्ये व्यस्त आहोत, असं ते म्हणाले. आपला स्वतःचाही अटेंशन स्पॅन आता काही सेकंदांचाच राहिला आहे. त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडियाला पूर्णपणे नाकारण्याची गरज नाही. त्याचा वापर कसा करायचा, यावर लक्ष देण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत शहरी आणि ग्रामीण भागात गॅप आहे, हे त्यांनी मान्य केलं. मात्र ती गॅप आता कमी होत आहे आणि पाच वर्षांत ती राहणारही नाही, असं फडणवीस म्हणाले.

AI बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, AI कडे मानवी संवेदना नाही आणि एथिक्सही नाही. हेच सगळं आपल्या शैक्षणिक सिस्टीमचं मूल्य आहे आणि हेच AI कडे नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यक्रमात नितीश भारद्वाज यांनी आमच्या सरकारकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्या अपेक्षांचा आम्ही नक्कीच विचार करू, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ