गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:46 IST

मिथुन चक्रवर्ती बंगाल सरकारचे सल्लागार, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

पश्चिम बंगाल सरकारने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

मिथुन चक्रवर्ती बंगाल सरकारचे सल्लागार, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने एक मोठी जबाबदारी दिली आहे. राज्याच्या माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे या पदासोबत त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही देण्यात आला आहे.

या नियुक्तीची अधिसूचना राज्य सरकारच्या कार्मिक व प्रशासकीय सुधारणा विभागाने काढली आहे. अधिसूचनेनुसार, राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतरच मिथुन चक्रवर्ती यांची ही नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती लगेचच लागू झाली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ती कायम राहणार आहे. माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाचे सल्लागार म्हणून ते सरकारला सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शन करतील.

मिथुन चक्रवर्ती यांचा बंगालच्या चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राशी खूप जुना संबंध आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि बंगाली अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केले आहे. बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांना 'महागुरू' या नावानेही ओळखले जाते.

याआधी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मिथुन चक्रवर्ती यांना सांस्कृतिक सल्लागाराची जबाबदारी देणार असल्याची घोषणा केली होती. बंगालमधील चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा वापर करून घ्यायचा, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

या नव्या जबाबदारीमुळे आता मिथुन चक्रवर्ती यांचा राज्य सरकारच्या सांस्कृतिक धोरणांशी तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांशी थेट संबंध येणार आहे. बंगालच्या कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रासाठी पुढे आखल्या जाणाऱ्या योजनांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे या नियुक्तीनंतर म्हटले जात आहे.

मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या प्रचारात दिसत होते. यंदा पश्चिम बंगालमध्ये भाजपला जो ऐतिहासिक विजय मिळाला, त्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणापासून लांब राहिलेले मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगालमधील सत्तापरिवर्तनात भाजपसाठी खूपच फायद्याचे ठरले, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ