सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:48 IST

तापकीरवाडीतील आदिवासींना टाटाकडून ना जमीन ना घरे; घरांवर दगड, भिंतींना तडे

तापकीरवाडीतील आदिवासींना टाटाकडून ना जमीन ना घरे; घरांवर दगड, भिंतींना तडे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी आणि धनगरवाडा येथील आदिवासी कुटुंबांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. जवळच टाटा समूहाच्या माध्यमातून धरण बांधले जाणार आहे आणि त्याचे खोदकाम गेले वर्षभर सुरू आहे. या खोदकामात सुरुंग लावून स्फोट केले जातात, तेव्हा आजूबाजूच्या घरांवर दगड येऊन पडतात, असे येथील लोक सांगतात.

टाटा कंपनी भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत, भिवपुरी गावाजवळ आपल्या मालकीच्या जमिनीवर हे काम करत आहे. जलविद्युत प्रकल्पासाठी 65 एकर जमिनीत खोल खड्डा खणला जात असून सुमारे 100 मीटर खोदकाम करून पाणी साठवणारा मोठा तलाव तयार केला जात आहे. वीज साठवण्यासाठी उदंचन पद्धतीचा 1000 मेगाव्हॅटचा प्रोजेक्ट वर्षभरापासून सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून जमिनीत उत्खनन चालू आहे आणि दिवसरात्र अवजड मशिन राबत आहेत.

खोदकामातून निघणारी माती आणि दगड एका बाजूला साठवले जात आहेत. त्यामुळे इमारतीएवढ्या उंचीचे मातीचे ढीग, म्हणजे एक प्रकारचे डोंगरच उभे राहिले आहेत. हे ढिगारे उद्या तापकीरवाडी धनगरवाड्यातील 22 घरांवर कोसळले, तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती आहे. हे डोंगर स्थानिकांसाठी जीवघेणे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. या कामामुळे परिसरातील पर्यावरणही धोक्यात आले आहे.

याबाबत प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही, म्हणून तापकीरवाडीतील धनगरवाड्याचे आदिवासी ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत. धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या तापकीरवाडी आणि धनगरवाड्याचे पुनर्वसन करू, असे आश्वासन टाटा कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या उपोषणाच्या वेळी दिले होते. त्या लेखी आश्वासनाला आता अकरा महिने झाले, तरी कंपनीने काहीही कार्यवाही केलेली नाही.

त्यामुळे संपूर्ण पावसाळा येथील आदिवासींनी जीव मुठीत धरूनच काढला. रात्री घरावर दगड येतात, म्हणून लहान मुलांना कुशीत घेऊन रात्र काढण्याची वेळ कुटुंबांवर आली आहे. दगडांमुळे दुखापत होण्याची भीती आहे आणि दुसरीकडे घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. आदिवासींची घरे कोसळण्याची वाट टाटा कंपनी पाहत आहे का, असा सवाल सीता गंगाराम शिद यांनी उपस्थित केला आहे.

सीता गंगाराम शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया अशी दिली: आमचे मरण याच पडक्या घरात आहे असे आम्हाला दिसू लागले आहे. आम्हाला जमीन देत नाहीत, घरे बांधून देत नाहीत आणि साधे प्यायचे पाणीही टाटा कंपनी देत नाही. त्यांना आमचे जीवन संपवायचे आहे असे आम्हाला वाटू लागले आहे.

येथील ज्येष्ठ महिलांनी तर जाहीर आरोप केला आहे की, आमची कोणतीही मागणी मान्य न करता आदिवासींचे बळी घेण्याचा टाटा कंपनीचा डाव आहे. वर्षभर जमीन घेऊन घरे बांधून दिली जातील, असे सांगितले जात होते, पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ