सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा त्याग आणि शौर्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे, आमदार जोरगेवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूरमध्ये शहीद बाबुराव शेडमाके यांच्या बलिदान दिनानिमित्त झालेल्या आदरांजली कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा त्याग आणि शौर्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे, आमदार जोरगेवार यांचे प्रतिपादन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांनी दिलेला लढा, त्यांचे अतुलनीय शौर्य, त्याग आणि समाजावरची निष्ठा आजही सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जोरगेवार यांनी केले.

क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती आणि आदिवासी कृती समिती, चंद्रपूर यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या बलिदान (शहीद) दिनानिमित्त २१ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्मारकात आदरांजली व प्रबोधन कार्यक्रम झाला. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीताताई खांडेकर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर हे उपस्थित होते. शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे विलास मसराम, गणेश गेडाम, भैय्याजी उईके, तसेच नगरसेवक जितेश कुळमेथे, कमलेश आत्राम, विठ्ठल कुमरे, भोला मडावी, राजेंद्र दुर्वे, शंकर उईके, शाम गेडाम, दिवाकर मेश्राम, नथ्थू गेडाम, वीरेंद्र कुमरे आणि अनिल सिडाम आदींचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, बाबुराव शेडमाके यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या संघर्षातून स्वाभिमान, धैर्य आणि मातृभूमीवरील निष्ठा दिसून येते, असे ते म्हणाले. त्यांचे बलिदान हा फक्त इतिहासाचा भाग नाही. अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारा तो विचार आहे, असे जोरगेवार यांनी सांगितले.

त्यांच्या कार्याचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे आणि पुढच्या पिढीला त्यांच्या पराक्रमाची ओळख करून देणे गरजेचे आहे, असेही आमदार जोरगेवार यांनी म्हटले.

आदिवासी समाजाचा इतिहास संघर्ष, शौर्य आणि त्यागाच्या गौरवशाली परंपरेने समृद्ध आहे, असे जोरगेवार यांनी या वेळी सांगितले. या परंपरेतील क्रांतिकारकांचे योगदान समाजासमोर आणणे, त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या विचारांना व्यापक रूप देणे महत्त्वाचे आहे, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ