सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:22 IST

इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार एआयचे धडे, एनसीईआरटीचे नवे मॉड्युल

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि एआय इंटेलिजन्सवर नवे प्रारंभिक मॉड्युल तयार केले आहे.

इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार एआयचे धडे, एनसीईआरटीचे नवे मॉड्युल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवे मॉड्युल तयार केले आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनसीईआरटीने हे काम केले आहे. कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि एआय इंटेलिजन्स या विषयांवरचे हे प्रारंभिक मॉड्युल शाळेतील मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये ज्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, त्यांना धरूनच हे मॉड्युल बनवले गेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये २१ व्या शतकात लागणारी आवश्यक कौशल्ये, तांत्रिक जागरूकता आणि लॉजिकल थिंकिंग वाढवणे, हा त्यामागचा हेतू आहे. या मॉड्युलची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ते वाचण्यासाठी एआयची आधीपासून माहिती असण्याची गरज नाही, म्हणजेच कोणताही विद्यार्थी ते सहज वाचू शकतो.

एनसीईआरटीतर्फे जारी झालेल्या प्रेस रिलीजनुसार, या मॉड्युलमध्ये कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे समस्या ओळखणे आणि त्या पद्धतशीरपणे व तर्कशुद्धपणे सोडवणे. याच्या मदतीने एआयची आपल्या रोजच्या आयुष्यात काय भूमिका असते आणि ते कसे काम करते, हे विद्यार्थ्यांना समजून घेता येईल.

शिकणे रंजक आणि प्रत्यक्ष उपयोगाचे व्हावे म्हणून मॉड्युलमध्ये अनुभवातून आणि कृतीतून शिकण्याची पद्धत वापरली आहे. त्यात चर्चा, प्रत्यक्ष व प्रॅक्टिसचे प्रयोग आणि आत्मचिंतन अशा उपक्रमांचा समावेश आहे.

डिजिटल साधनांची कमतरता लक्षात घेऊन प्रत्येक अॅक्टिव्हिटी ऑनलाइन तसेच ऑफलाइन घेता येईल. त्यामुळे ज्या शाळांकडे साधने कमी आहेत किंवा इंटरनेट मर्यादित आहे, तिथल्या विद्यार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल.

टेक्नोलॉजीचा वापर अधिक सुरक्षित, निष्पक्ष आणि जबाबदारीने व्हावा, यावर या मॉड्युलमध्ये विशेष लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांच्या जागरुकतेवर अधिक भर दिला जाणार आहे. डिजिटल सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाची गोपनीयता राखणे, तसेच इंटरनेटवर पसरणाऱ्या चुकीच्या माहितीची निष्पक्षपणे पडताळणी करणे, हे त्यातले मुद्दे आहेत.

विद्यार्थ्यांनी एआयवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, तर माहितीतील अचूकता आणि व्हेरिफिकेशन तपासायला शिकावे, असेही यात सांगितले आहे. शिवाय मानवी विवेक, सर्जनशीलता आणि नैतिकतेची जबाबदारी या गोष्टींबद्दलही मॉड्युलमध्ये मार्गदर्शन आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ