सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:02 IST

एका ईअरबडमधून आवाज कमी येतोय? नवीन घेण्याआधी घरबसल्या करा हे सोपे उपाय

एका ईअरबडमधून कमी आवाज येणे ही सर्वात सामान्य अडचण आहे. नवीन ईअरबड्स घेण्याआधी काही सोपे उपाय करून बघता येतात.

एका ईअरबडमधून आवाज कमी येतोय? नवीन घेण्याआधी घरबसल्या करा हे सोपे उपाय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

स्मार्टफोनप्रमाणेच ईअरबड्स हेही आपल्या रोजच्या वापरातले एक महत्त्वाचे गॅझेट झाले आहे. गाणी ऐकायची असोत, चित्रपट बघायचा असो किंवा कॉलवर बोलायचे असो, या सगळ्यासाठी ईअरबड्सचा वापर केला जातो. सध्या वायरलेस ईअरबड्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्यांचा आकार छोटा असतो, ते वजनाने हलके असतात आणि वापरायलाही अतिशय सोपे असतात. त्यामुळे ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण ईअरबड्स वापरतात.

पण ईअरबड्स वापरताना कधी कधी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यातली सर्वात सामान्य अडचण म्हणजे एका ईअरबडमधून कमी आवाज येणे. अशा वेळी गाणी ऐकण्याचा किंवा चित्रपट बघण्याचा अनुभव पूर्णपणे बिघडतो. अनेक यूजर्स या अडचणीमुळे नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा विचारही करतात. पण असे करण्याची काहीच गरज नसते. एका ईअरबडमधून आवाज कमी येत आहे, म्हणजे डिव्हाईस पूर्णपणे खराब झाले आहे असे नसते. सेटिंगमधली गडबड किंवा ईअरबड्समध्ये साचलेली धूळ ही त्यामागची कारणे असू शकतात. नवीन ईअरबड्स घेण्याआधी काही सोपे उपाय वापरून बघा. तुम्ही घरबसल्या अगदी सहज ही अडचण सोडवू शकता.

कोणत्याही एका ईअरबडमधून कमी आवाज येत असेल, तर सगळ्यात आधी तपासा की अडचण ईअरबड्समध्ये आहे की तुमच्या फोनमध्ये. तुमच्या फोनला कनेक्ट केल्यानंतर आवाज कमी येत असेल, तर ईअरबड्स दुसऱ्या फोनला कनेक्ट करून गाणी ऐका. तुमचे ईअरबड्स दुसऱ्या फोनवर व्यवस्थित चालत असतील, तर अडचण तुमच्या फोनमध्ये असू शकते.

दुसऱ्या फोनला कनेक्ट केल्यानंतरही आवाज कमीच येत असेल, तर आधी स्पीकरच्या जाळीवरची धूळ साफ करा. कारण सतत वापरल्यामुळे ईअरबड्सच्या स्पीकरच्या जाळीवर धूळ जमा होते आणि त्यामुळे आवाज कमी येतो. सुके मऊ कापड, हलका ब्रश किंवा कॉटन बड घेऊन जाळी हळूहळू स्वच्छ करा. यासाठी कोणतीही टोकदार वस्तू वापरू नका.

दुसरी गोष्ट म्हणजे योग्य सिलिकॉन टिप वापरणे. ईअरबड्सवर असलेली रबरची सिलिकॉन टिप अनेकदा कानात नीट बसत नाही. त्यामुळे ईअरबड्स वापरत असतानाही बाहेरचा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकू येतो आणि गाणी ऐकण्याचा किंवा चित्रपट बघण्याचा अनुभव बिघडतो. अशा वेळी ईअरबड्सबरोबर मिळणाऱ्या इतर सिलिकॉन टिप लावून बघा आणि ती कानात नीट फिट बसते आहे की नाही ते तपासा.

ईअरबड्समधून नीट आवाज न येण्याचे आणखी एक कारण म्हणजे फोनची लेफ्ट-राइट ऑडियो बॅलेन्स सेटिंग बदलणे. ऑडिओ बॅलेन्स सेटिंगमधला स्लायडर चुकून एका बाजूला गेला असेल, तर ईअरबड्समधल्या आवाजाची गुणवत्ता आपोआप बदलू शकते. यासाठी फोनच्या सेटिंगमधल्या एक्सेसिबिलिटी आणि हियरिंग सेक्शनमध्ये जा. तिथे ऑडिओ ऍडजस्टमेंट किंवा ऑडिओ बॅलेन्सचा स्लायडर सेंटरमध्ये सेट करावा लागेल. तसेच मोनो ऑडिओचा टोगलही तपासा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ