सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:37 IST

जिवतीत ड्राय डेला ३०० देशी दारूच्या बाटल्या जप्त

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे ड्राय डेच्या दिवशी चोरून देशी दारू विकणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई करून साडेतेरा हजार रुपयांची दारू जप्त केली.

जिवतीत ड्राय डेला ३०० देशी दारूच्या बाटल्या जप्त छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे ड्राय डेच्या दिवशी शासनाचे नियम मोडून चोरून देशी दारू विकणाऱ्या एका इसमावर जिवती पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून साडेतेरा हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध दारू विकणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी ड्राय डे असल्याने जिवती येथे दारू विक्रीवर बंदी होती. तरीही मौजा जिवती परिसरात अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा-गडचांदूर उपविभागीय पथकाला मिळाली होती.

या माहितीवरून पथकाने लगेच जिवती परिसरात सापळा रचून कारवाई केली. गस्त सुरू असताना पंचांसमोर एका इसमाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे कोणत्याही परवान्याशिवाय, बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठवून ठेवलेली दारू सापडली.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ९० मिली क्षमतेच्या 'रॉकेट संत्रा' कंपनीच्या देशी दारूच्या एकूण ३०० बाटल्या जप्त केल्या. या दारूची एकूण किंमत १३ हजार ५०० रुपये आहे. सगळा मुद्देमाल पंचांसमोर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी चंद्रकांत शेषराव फुकटवाड (वय २५ वर्षे, रा. धोंडाअर्जुनी, ता. जिवती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध जिवती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपराध क्रमांक १८८/२३ असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई राजुरा-गडचांदूर उपविभागाच्या पथकाने केली. परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ