रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:09 IST

जिबूतीजवळ बोट बुडाली: १५ मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, सुमारे ११६ बेपत्ता

आफ्रिकेतील जिबूतीच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली. संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडली.

जिबूतीजवळ बोट बुडाली: १५ मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, सुमारे ११६ बेपत्ता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जिबूतीच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. आफ्रिकेतील या दुर्घटनेत १५ लहान मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून, सुमारे ११६ जण अद्याप बेपत्ता आहेत.

गेल्या काही काळात परदेशात बोट उलटण्याचे आणि बोट जळण्याचे बरेच प्रसंग घडले आहेत. त्यात आता जिबूतीच्या किनाऱ्याजवळच्या या घटनेची भर पडली आहे. ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने रविवारी दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे आफ्रिकेत स्थलांतरितांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिबूतीच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. चांगल्या भविष्याच्या आणि रोजगाराच्या शोधात धोकादायक समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला. मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश असल्याने घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. बोट बुडाल्यानंतर अनेक प्रवासी समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्याचे आव्हान मोठे असून सर्व बचाव यंत्रणा आता कामाला लागल्या आहेत.

आफ्रिकेतील अनेक देशांमधून रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि चांगल्या जीवनाच्या शोधात हजारो लोक धोकादायक मार्गाने स्थलांतर करतात. या समुद्रप्रवासात अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत भरलेले असतात. प्रवास सुरू असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसते. खराब हवामान आणि मानवी तस्करीचे जाळे यामुळे अशा प्रवासात अपघातांचा धोका आणखी वाढतो. जिबूतीजवळच्या या दुर्घटनेने स्थलांतरितांच्या प्रवासातील धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

या दुर्घटनेत १०९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर सुमारे ११६ जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या लक्षात घेता, अलीकडच्या काळातील गंभीर स्थलांतरित दुर्घटनांपैकी ही एक ठरली आहे. बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी आता बचाव पथके कामाला लागली आहेत.

मृतांची ओळख पटवणे हेही प्रशासनासमोरील महत्त्वाचे काम आहे. या दुर्घटनेनंतर समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरावर नियंत्रण आणण्याबरोबरच स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ