सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:16 IST

हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँकेत ११० जागांसाठी भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांना संधी

दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई या बँकेने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अर्ज ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करता येतील.

हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँकेत ११० जागांसाठी भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांना संधी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई या बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. बँक २६ शाखांच्या माध्यमातून तब्बल १५०० कोटींचा व्यवसाय करते. बँकेत रिक्त असलेल्या कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) आणि शिपाई (Peon) या दोन पदांच्या एकूण ११० जागांसाठी बँकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज भरण्याचा कालावधी १७ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ असा आहे. शेवटच्या दिवशी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

कनिष्ठ लिपिक पदाच्या ६० जागा आहेत. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागते. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तसेच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा येणे गरजेचे आहे. वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे आहे. परीक्षेत जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, गणित, मराठी व इंग्रजी व्याकरण, संगणक साक्षरता आणि बँकिंग हे विषय असतील. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.

शिपाई पदाच्या ५० जागा आहेत. यासाठी उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षे आहे. परीक्षेत जनरल नॉलेज, मराठी, प्राथमिक इंग्रजी ज्ञान आणि सामान्य गणित या विषयांवर प्रश्न असतील. या परीक्षेचे माध्यम मुख्यत्वे मराठी असेल.

दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांची आहे. त्यात ९० गुणांची ऑनलाईन परीक्षा, ५ गुणांची तोंडी मुलाखत आणि विशेष गुणवत्तेसाठी ५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असून सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील.

परीक्षा शुल्क रु. १०००/- अधिक १८% जीएसटी (GST) आणि बँक चार्जेस असे आहे. हे शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट गेटवेमार्फतच स्वीकारले जाईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी http://sznsbal.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथे नाव नोंदणी करून ऑनलाईन फॉर्म भरावा. अर्जासोबत पासपोर्ट साईझ फोटो (२० KB पर्यंत) आणि पांढऱ्या कागदावर केलेली स्वाक्षरी (२० KB पर्यंत) स्पष्टपणे अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून अर्ज सबमिट (Submit) करावा आणि अर्जाची व पावतीची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवावी.

अधिक माहिती हवी असल्यास इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकतात.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ