साऊथ इंडियन बँकेत जुनियर ऑफिसर पदांसाठी भरती, २७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज
साऊथ इंडियन बँकेने 'जुनियर ऑफिसर (ऑपरेशन्स)' पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगरात जागा आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
साऊथ इंडियन बँकेने 'जुनियर ऑफिसर (ऑपरेशन्स)' या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून २७ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळ न घालवता अर्ज करायला हवा.
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठीही ही चांगली संधी आहे. औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. मात्र संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात राहणारे उमेदवारच अर्ज करू शकतात. स्थानिक भाषा चांगली येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट अशी आहे की अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराचा जन्म ०१.१०.१९९८ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. कमाल वय २८ वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना वयात ५ वर्षांची सवलत लागू आहे.
शिक्षणाबद्दल बोलायचे तर कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेली असणे गरजेचे आहे. शिवाय पात्र उमेदवाराला बँका किंवा NBFC मध्ये किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना एकूण वार्षिक सीटीसी (CTC) सुमारे Rs ५.१४ लाख मिळेल. त्याखेरीज बँकेच्या खर्चाने ४० लाख रुपयांपर्यंतचा ग्रुप पर्सनल अपघात विमा दिला जाईल. तसेच ५,२५,००० रुपयांची आरोग्य विमा पॉलिसीही दिली जाईल.
नियुक्ती सुरुवातीला ३ वर्षांच्या करारावर (Contract) केली जाईल. हा करार कामगिरीच्या मूल्यांकनानुसार आणि बँकेच्या विवेकबुद्धीप्रमाणे पुढे वाढवता येईल.
अर्ज कसा करायचा, तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. वेबसाइटचा पत्ता www.southindianbank.bank.in असा आहे, किंवा https://recruit.southindianbank.com/RDC/ या लिंकवरूनही अर्ज करता येईल. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच आणि २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.