सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:34 IST

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या गवराळा येथील दोन बहिणींना मदतीची गरज

गवराळा येथील स्व. अनिल मिटपल्लीवार यांच्या दोन मुली अनाथ झाल्या असून त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि संगोपनासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या गवराळा येथील दोन बहिणींना मदतीची गरज छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गवराळा येथील स्व. अनिल मिटपल्लीवार यांच्या दोन मुलींच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र गेले आहे. त्यामुळे या दोघींसमोर शिक्षण, आरोग्य आणि संगोपन असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कु. संध्या आणि कु. तेजू या दोन्ही बहिणींना आधार देण्यासाठी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.

काही वर्षांपूर्वी या मुलींच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची आई सौ. सुरेखा अनिल मिटपल्लीवार यांचेही आजारपणामुळे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले. त्यामुळे आता दोन्ही मुली अनाथ झाल्या आहेत.

कु. संध्या भद्रावती येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहे, तर कु. तेजू गवराळा येथील कर्मवीर विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. तेजूला दृष्टीदोष असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्याचीही गरज आहे.

दोघींचे शिक्षण सुरू राहावे, तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्यसेवा, राहण्याची सोय आणि रोजच्या गरजा मिळाव्यात, यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, म्हणून सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक-सचिवांनी या मुलींना मदतीचा हात देण्याची तयारी दाखवली आहे. दत्तकत्वाची औपचारिकता पूर्ण करून मुलींच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याशी संबंधित गरजा आणि संगोपनाची जबाबदारी घेण्यासाठी ट्रस्ट प्रयत्न करणार आहे. या मदतीमुळे दोन्ही बहिणींना आत्मनिर्भर होण्यासाठी बळ मिळणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ