बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:33 IST

गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू होणार, १५ ते १७ ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा

चंद्रपूर-मूल रोडवरील नव्या शोरूममध्ये तीन दिवस उद्घाटन ऑफर्स, १५ ऑक्टोबरला अभिनेत्री शिल्पा शिंदे उपस्थित राहणार.

गडचिरोली शहरात रोकडे ज्वेलर्सचे नवे आणि अत्यंत भव्य शोरूम सुरू होत आहे. चंद्रपूर-मूल रोड, गडचिरोली येथे असलेल्या या शोरूमचा तीन दिवसांचा उद्घाटन सोहळा १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून होणार आहे. अशी माहिती रोकडे ज्वेलर्सच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य भारतातील सर्वात मोठे आणि विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून रोकडे ज्वेलर्स ओळखले जाते. हा ब्रँड ५ पिढ्यांपासून चालत आला असून १२४ हून अधिक वर्षांच्या अखंड परंपरेचा वारसा त्याला लाभला आहे. समर्पित पार्किंग क्षेत्रासह ३,६०० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेले हे शोरूम गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि सर्वात आधुनिक दागिने खरेदीचे केंद्र ठरणार आहे.

या विस्ताराचे नेतृत्व प्रमोटर श्री. भैयाजी रोकडे, श्रीमती वंदना भैयाजी रोकडे, व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. राजेश भैयाजी रोकडे, संचालक श्री. सारंग भैयाजी रोकडे, संचालक श्री. पारस राजेश रोकडे, तसेच प्रमोटर श्रीमती अनामिका राजेश रोकडे आणि श्रीमती संस्कृती सारंग रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

सोहळ्याला ग्लॅमरची जोड देण्यासाठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय, पुरस्कार विजेती आयकॉन आणि गाजलेल्या 'बिग बॉस' रिॲलिटी शोची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे १५ ऑक्टोबर रोजी विशेष उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची रोकडे ज्वेलर्सचे अधिकृत ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. "महाराष्ट्राचे भाऊ आणि वाहिनी" म्हणून ओळखली जाणारी ही जोडी विश्वास, कौटुंबिक मूल्ये आणि आधुनिकतेचे प्रतीक म्हणून ब्रँडशी जोडली गेली आहे.

ग्राहकांसाठी रोकडे ज्वेलर्सने सोन्याचे दागिने पुन्हा बजेटमध्ये आणले आहेत. २२ कॅरेट गोल्ड ज्वेलरीवर घडणावळ (Making Charges) अवघ्या ५% पासून सुरू होणार असून ग्राहकांना सर्टिफाइड आणि हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करता येतील. नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी हलके, मजबूत आणि दैनंदिन जीवनशैलीला साजेसे १८ कॅरेट प्लेन गोल्ड ज्वेलरीचे विदर्भातील सर्वात मोठे कलेक्शन सादर केले जात आहे. आगामी महिन्यांच्या खरेदीसाठी दुर्मिळ डायमंड मास्टरपीस, एक्सक्लूसिव्ह पोलकी क्रिएशन, सिग्नेचर ब्रायडल कलेक्शन आणि लिमिटेड एडिशन डिझायनर ज्वेलरी उपलब्ध असणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी एक्सक्लूसिव्ह इनॉग्युरल ऑफर्स लागू असतील. सोन्या व चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) फ्लॅट ५०% सूट, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट १००% ची पूर्ण सूट (100% OFF) आणि प्रत्येक खरेदीवर मेकिंग चार्जेसवर २५% अ‍ॅश्युअर्ड गिफ्ट वाउचर दिले जाणार आहे. हे वाउचर पुढील खरेदीवर रिडीम करता येईल.

याशिवाय २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर विशेष घडणावळ ५% पासून सुरू आहे. राशिरत्न क्रय सुरक्षा योजनेअंतर्गत २१ दिवसांचा ट्रायल पिरियड व मनी बॅक गॅरंटी मिळणार असून १९,९९९ रुपयांपासून सुरू होणारी परवडणारी डायमंड रेंज आणि १८ कॅरेट येलो गोल्डचे मॉर्डन कलेक्शनही उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सुलभ बचतीसाठी गोल्ड बाइंग प्लॅन, डिजिटल गोल्ड प्लॅन, मंथली इन्स्टॉलमेंट प्लॅन, गोल्ड एक्स्चेंज अँड अपग्रेड प्लॅन, फ्युचर वेडिंग प्लॅन आणि डायमंड अँड सिल्वर स्पेशल प्लॅन असे ६ नवीन ज्वेलरी बाइंग प्लॅन्स सुरू करण्यात आले आहेत.

सध्या नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे १० यशस्वी शोरूम चालवल्यानंतर गडचिरोलीतील हे नवे फ्लॅगशिप शोरूम सुरू होत आहे, त्यामुळे शोरूमची संख्या वाढणार आहे. आगामी ३ महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यातही नवीन शोरूम सुरू झाल्यावर एकूण संख्या १२ होईल. महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही विस्ताराची योजना आहे.

ग्राहक सुरक्षा आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी अत्याधुनिक कॅरेटमीटर मशीन्स, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि कडक सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे. जुने सोने वितळवण्याच्या प्रक्रियेचे रेकॉर्डिंग आणि टॅक्स इनव्हॉइसमध्ये तपशीलवार माहिती देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गेल्या १२४ वर्षांहून अधिक काळ लाखो कुटुंबांच्या विश्वासाचे प्रतीक बनलेल्या या सोहळ्यात आणि ३ दिवसांच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोकडे ज्वेलर्सच्या वतीने गडचिरोलीतील नागरिकांना करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ