बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:33 IST

जीई एरोस्पेस २०३० पर्यंत भारतातील पुरवठादारांवरचा खर्च जवळपास दुप्पट करणार

जीई एरोस्पेसने २०२५ ते २०३० दरम्यान देशांतर्गत पुरवठादार खर्चात जवळपास दुप्पट वाढ करण्याची योजना जाहीर केली आहे.

जीई एरोस्पेस (NYSE:GE) या कंपनीने २०२५ ते २०३० या काळात भारतातील देशांतर्गत पुरवठादारांवरचा खर्च (सप्लायर स्पेंड) जवळपास दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे. भारतात विमान प्रवासाची मागणी वाढत आहे आणि विमान वाहतूक उद्योगात कंपनीचे नेतृत्व आहे, त्याला पाठबळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले.

अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) यांनी तयार केलेल्या 'पॉवरिंग प्रोग्रेस: जीई एरोस्पेस इकॉनॉमिक इम्पॅक्ट इन इंडिया' या नव्या अहवालाच्या प्रकाशनाच्या वेळी ही घोषणा झाली. जीई एरोस्पेसने उद्योग क्षेत्रातील प्रमुखांचा एक मेळावा भरवला होता, 'इंडिया टेकिंग फ्लाइट - एव्हिएशन, इनोव्हेशन अँड द रोड टू विकसित भारत २०४७' असे त्याचे नाव. तिथेच हा अहवाल प्रसिद्ध झाला. व्यावसायिक विमान वाहतूक, संरक्षण, उत्पादन आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांवर कंपनीच्या भारतातील चार दशकांच्या प्रभावाचे हे पहिलेच सर्वसमावेशक मूल्यांकन आहे.

अहवालानुसार भारतातील देशांतर्गत कमर्शियल एअरलाइन्सनी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये अंदाजे १९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळवला. जीई एरोस्पेस प्रगत इंजिन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची विश्वासार्हता व कामगिरी देते. अंदाजे ३,७०,००० प्रत्यक्ष रोजगारांना आधार देणाऱ्या या क्षेत्राला लागणारी कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमता मिळवून देण्यात कंपनीची मदत होते. डिसेंबर २०२५ पर्यंत जीई एरोस्पेस आणि कंपनीच्या भागीदारांनी बनवलेल्या १,४०० हून अधिक इंजिनांचा ताफा आहे. भारतातील बहुतांश कमर्शियल एअरलाइन्सची विमाने या इंजिनांवर चालतात. या इंजिनांमुळे भारतातील विमान कंपन्यांनी जगातील सर्वाधिक ८८.२ टक्के प्रवासी भार घटक आणि दररोज १२ ते १४ तास विमानांचा वापर दर नोंदवला, जो जागतिक आकडेवारीपेक्षा खूप पुढे आहे.

जीई एरोस्पेसचे दक्षिण आशियामधील सीईओ विक्रम राय म्हणाले, "भारताची व्यावसायिक विमान वाहतूक वाढ जगातील सर्वात जलद गतीने होणाऱ्या वाढींपैकी एक आहे, आणि आजच्या या अहवालामधून निदर्शनास येते की, आमची येथील कटिबद्धता केवळ इंजिन्स विकण्यापुरती मर्यादित नाही. ही कटिबद्धता पुण्यात मशीनिंग होणाऱ्या घटकांमध्ये, बेंगळुरूमधील नाविन्यतेमध्ये आणि भारताच्या एरोस्पेस उद्योगाची पुढची पिढी घडवणाऱ्या आमच्या विश्वासू ग्राहकांमध्ये सामावली आहे. भारत आपल्या 'विकसित भारत'च्या महत्त्वाकांक्षांच्या दिशेने काम करत असताना पुरवठा साखळी परिसंस्थेच्या वाढीसाठी आमचा खर्च दुप्पट करणे ही वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करेल."

भारत सरकारच्या अंदाजानुसार वार्षिक देशांतर्गत प्रवासी वाहतूक आर्थिक वर्ष २०२६ मधील ३४० दशलक्षवरून २०४० पर्यंत १.१ अब्जांवर पोहोचेल. २०४७ पर्यंत विमानतळांची संख्या १६३ वरून ३५० हून अधिक होणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आशियाला २०४४ पर्यंत ३,३०० अतिरिक्त विमाने किंवा ६,६०० अतिरिक्त इंजिनांची गरज भासेल. जुलै २०२६ मध्ये इंडिगोने ५१० एअरबस ए३२०निओ फॅमिली विमानांसाठी १,००० हून अधिक एलईएपी-१ए इंजिनांच्या ऑर्डरबाबत सीएफएम इंटरनॅशनलसोबत सामंजस्य करार जाहीर केला. एलईएपी इंजिनांसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी एकल ऑर्डर आहे आणि सीएफएम इंटरनॅशनलसाठी विक्रम आहे. इंडिगोच्या आगामी इंजिन एमआरओ सुविधेच्या उभारणीतील सहयोगाचाही त्यात समावेश आहे.

भारतातील विमान कंपन्यांनी आधीच अंदाजे १,५०० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी बहुतांश विमानांमध्ये जीई एरोस्पेस आणि कंपनीच्या भागीदारांची इंजिन्स असतील, अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार भारताच्या देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल उद्योगासाठी ही संधी ५.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याची आहे.

पुण्यातील जीई एरोस्पेसचा मुख्य प्लांट सुरुवातीला २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारला गेला होता. २०२४ पासून कंपनीने ऑटोमेशनचा विस्तार, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेत वाढ आणि मनुष्यबळ विकास यासाठी जवळपास ५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवले आहेत. यामुळे भारतातील उत्पादन क्षमता अधिक मजबूत झाली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसह १७ प्रमुख देशांतर्गत भागीदार आणि पुणे प्रकल्प मिळून तयार झालेल्या पुरवठादार नेटवर्कचे त्याला पाठबळ आहे. कंपनीने २०२५ मध्ये या देशांतर्गत पुरवठा साखळीवर अंदाजे २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत हा खर्च दुप्पट करण्याची योजना आहे.

२०१५ पासून पुणे प्लांटच्या अप्रेंटिसशिप उपक्रमातून अंदाजे ५,००० उत्पादन सहकारी पदवीधर झाले आहेत. दरवर्षी ४०० ते ५०० नवीन शिकाऊ उमेदवारांची नोंदणी होते. बेंगळुरूमध्ये इंजीनिअरिंग टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आणि शैक्षणिक संशोधन भागीदारी सुरू आहेत. त्यात आयआयटी मद्रासोबतचा प्रमुख संयुक्त नाविन्यता उपक्रम आहे, जो स्थानिक पातळीवर डिझाइन करून तयार केलेले मायक्रो टर्बोमशीन विकसित करत आहे. भारताचा एरोस्पेस अभियांत्रिकी पाया यातून सातत्याने मजबूत होत आहे.

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टांमध्येही जीई एरोस्पेसची इंजिन्स महत्त्वाची आहेत. १९८६ पासून कंपनीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) एलएम२५०० नौदल इंजिन्स आणि तेजस एमके१ हलक्या लढाऊ विमानाला ऊर्जा देणाऱ्या एफ४०४-आयएन२० इंजिनांसाठी सहयोग केला आहे. या प्लॅटफॉर्मची ४,००० हून अधिक इंजिन्स १६ देशांमध्ये कार्यरत आहेत. अंतिम करार आणि मंजुऱ्यांच्या अधीन राहून २०२३ मधील सामंजस्य करारात तेजस एमके२ प्रोग्रामसाठी एफ४१४ इंजिनांच्या संभाव्य देशांतर्गत उत्पादनाचा समावेश आहे. अपाचे हेलिकॉप्टर इंजिनांसाठी भारतीय हवाई दलासोबत पाच वर्षांचा परफॉर्मन्स बेस्ड लॉजिस्टिक्स करार कंपनीने केला आहे. एफ४०४-आयएन२० इंजिनांसाठी देशांतर्गत डेपो सुविधा उभारण्याचा स्वतंत्र करारही झाला आहे.

२००० मध्ये २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारलेले बेंगळुरू टेक्नॉलॉजी सेंटर हे अमेरिकेबाहेरील अशा प्रकारचे पहिले संशोधन आणि अभियांत्रिकी केंद्र होते. तेव्हापासून या केंद्राने १,००० हून अधिक एव्हिएशन पेटंट्स मिळवली आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली जेट इंजिन जीई९एक्सच्या डिझाइन, विकास आणि प्रमाणपत्रात त्याचे मोठे योगदान आहे. तिथले अभियंते जीई९०, जीपी७२००, जीइएनएक्स आणि जीई९एक्स इंजिनांच्या प्रमुख डिझाइनची जबाबदारी सांभाळतात. ग्राहकांच्या टिकाऊपणाच्या अपेक्षा पूर्ण करत इंधन कार्यक्षमतेत २० टक्के सुधारणा करण्याचे उद्दिष्ट असलेल्या सीएफएम राइज प्रोग्राममध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. केंद्राची डिजिटल टेक्नॉलॉजी टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) वापरातून कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळी, एमआरओ आणि विक्री ऑपरेशन्सना पाठबळ देते. या सर्व गुंतवणुकींतून भारताच्या विमान वाहतूक महत्त्वाकांक्षांच्या बरोबरीने एरोस्पेस क्षमता, उत्पादन, अभियांत्रिकी आणि संरक्षण आत्मनिर्भरता घडवण्याची जीई एरोस्पेसची चार दशकांची कटिबद्धता दिसते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ