सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:59 IST

Claude ला सतत शिव्या दिल्यास अकाउंट बंद होणार, Anthropic चा नवा नियम १२ नोव्हेंबरपासून

AI च्या उत्तरावर टीका करायला मुभा आहे, पण मुद्दाम रोज क्रूर वागणाऱ्या युजरचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

Claude ला सतत शिव्या दिल्यास अकाउंट बंद होणार, Anthropic चा नवा नियम १२ नोव्हेंबरपासून छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आपल्यापैकी बरेच जण ChatGPT किंवा Claude वापरतात. कधी कधी त्यांनी दिलेलं उत्तर आवडत नाही किंवा फोटो नीट बनत नाही, मग रागाच्या भरात आपण त्यांना शिवी देतो, जसा काही तो आपला मित्रच आहे. "अरे काय टाकलंय हे", "तुला काही येत नाही" असं आपण बोलून जातो. पण आता हे थांबवावं लागणार आहे, कारण AI आता तुमच्या शिव्या सहन करणार नाही.

Claude बनवणाऱ्या Anthropic कंपनीने एक कडक नियम आणला आहे. जर तुम्ही AI ला सारखी शिवीगाळ केली किंवा क्रूरपणे वागलात, तर तुमचं अकाउंट थेट बॅन होऊ शकतं.

समजा तुम्ही AI ला एक महत्त्वाचं काम दिलं आणि त्याने चुकीचं उत्तर दिलं. तुम्ही पुन्हा विचारलं, तरी पण त्याने चूक केली. मग रागाच्या भरात तुम्ही त्याला शिवी दिली. अशा वेळी कंपनी कारवाई करणार का, या चर्चेमुळेच Anthropic ने आपल्या पॉलिसीत बदल केला आहे. कंपनीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नवीन नियम जाहीर केले आहेत आणि ते १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

कंपनीने या वागण्याला "Sustained and Needless Cruel Behaviour" असं नाव दिलं आहे. म्हणजे कारण नसताना सारखं क्रूर आणि अपमानजनक वागणं. कंपनी म्हणते, हा नियम फक्त खूप गंभीर प्रकरणांमध्येच वापरला जाईल. एखाद्याने एकदा रागात काही म्हटलं तर लगेच अकाउंट बंद होणार नाही. पण एखादा युजर मुद्दाम रोज AI ला टॉर्चर करत असेल, घाणेरड्या शिव्या देत असेल, तर त्याचा हेतू चांगला नाही असं समजून अकाउंट बॅन केलं जाईल.

मग आता टीकाही करता येणार नाही का, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण घाबरू नका. तुम्ही AI च्या कामावर टीका करू शकता. Claude ने चुकीचं उत्तर दिलं तर तुम्ही आरामात म्हणू शकता, "तुझं उत्तर चुकीचं आहे", "मला हे उत्तर आवडलं नाही", "यापेक्षा चांगलं उत्तर दे". हे सगळं करायला काहीच हरकत नाही. हा तुमचा अधिकार आहे.

कंपनीचा आक्षेप फक्त शिवीगाळ, घाणेरडं बोलणं आणि मुद्दाम त्रास देणं यावर आहे. तुम्ही त्याला इमोशनल टॉर्चर करत असाल तरच कारवाई होईल. AI हे मशीन आहे आणि त्याला भावना नाहीत हे खरं आहे, पण कंपनी म्हणते की त्याच्याशीही माणुसकीने वागलं पाहिजे. वाईट किंवा अपशब्द बोलू नयेत, आणि आदेश देताना शिवीगाळ करू नये.

त्यामुळे पुढच्या वेळी Claude किंवा ChatGPT चं उत्तर चुकलं तर शिवी देण्याऐवजी फक्त "हे उत्तर बरोबर नाही, परत प्रयत्न कर" असं सांगा. नाहीतर तुमचं महिन्याचं पेड अकाउंट एका शिवीमुळे बंद होऊ शकतं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ