सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:54 IST

चंद्रपुरात दोन आमदारांचे दोन 'मन की बात' कार्यक्रम; व्हॉट्सॲप संदेशामुळे वाद

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना कार्यक्रमाला हजर राहण्यास सांगून गैरहजर राहिल्यास दंडाचा इशारा दिल्याने चंद्रपुरात चर्चा रंगली आहे.

चंद्रपुरात दोन आमदारांचे दोन 'मन की बात' कार्यक्रम; व्हॉट्सॲप संदेशामुळे वाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपुरात रविवारी (२५ ऑक्टोबर) पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमावरून नवा वाद उभा राहिला आहे. शहरातील एका विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना हा कार्यक्रम ऐकायला हजर राहण्यास सांगणारा संदेश गेला. कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास दंड भरावा लागेल, असा उल्लेखही त्या संदेशात होता.

'मन की बात'चा हा १३९ वा भाग होता. २५ ऑक्टोबर रोजी तो प्रसारित झाला. त्यानिमित्त चंद्रपुरात आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. म्हणजे एकाच कार्यक्रमासाठी शहरात दोन ठिकाणी, दोन्ही आमदारांकडून स्वतंत्रपणे दोन आयोजने झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबर २०१४ रोजी 'मन की बात' सुरू केली. पुढे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून तो प्रसारित होऊ लागला. देशातील नागरिकांशी संवाद, सामाजिक उपक्रम, समाजातील प्रेरणादायी व्यक्ती, देशातील सकारात्मक घडामोडी, स्वच्छता, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवर यात चर्चा होते. गेली १२ वर्षे हा कार्यक्रम न थांबता सुरू आहे.

आता एक दशक उलटल्यानंतर लोक या कार्यक्रमाकडे पाठ फिरवू लागले आहेत, असे म्हटले जात आहे. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठीच भाजपचे कार्यकर्ते हा कार्यक्रम आवर्जून ऐकतात, असेही सांगितले जाते. हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत नाही. त्याची स्क्रिप्ट आधीच तयारीनिशी लिहिलेली असते.

चंद्रपुरात 'मन की बात'ला मोठे आणि भव्य स्वरूप दिसावे, असा दोन्ही आमदारांचा प्रयत्न होता. पण गर्दी जमवायची कशी, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावर आमदार मुनगंटीवार यांनी पक्षामार्फत वेगवेगळी महाविद्यालये आणि प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

दुसरीकडे आमदार जोरगेवार यांच्याकडून शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, यासाठी संदेश पाठवण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनींना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला. आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमात सहभागी व्हावे, गैरहजर राहिल्यास दंड आकारला जाईल, असा इशारा त्यात देण्यात आला होता.

यामुळे विद्यार्थ्यांवर कार्यक्रमाला हजर राहण्याची सक्ती होत असल्याची चर्चा रंगली. आज देशात सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारता येत नाही, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे, अशा वातावरणात चंद्रपुरात विद्यार्थ्यांवर सक्ती केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी याचा निषेध नोंदवला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ