बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:14 IST

एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने चंद्रपुरात पालकाची ८.९८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासाठी चंद्रपुरातील पालकाकडून ८ लाख ९८ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात जोगेंदर सिंग आणि ओम प्रकाश राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

एमबीबीएस प्रवेशाच्या आमिषाने चंद्रपुरात पालकाची ८.९८ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर : एमबीबीएसला थेट प्रवेश मिळवून देतो, असे सांगून चंद्रपुरातील एका पालकाकडून ८ लाख ९८ हजार रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात जोगेंदर सिंग (रा. उदयपूर, राजस्थान) आणि ओम प्रकाश राठोड (रा. बीड, महाराष्ट्र) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमी पैशात आणि ओळखीच्या जोरावर प्रवेश करून देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप तक्रारीत आहे.

तक्रारदार मंगेश प्रभाकरराव भोंबे (वय ५०, रा. प्लॉट नंबर १९, उपगल्लावर ले-आऊट, तुकूम, चंद्रपूर) हे चंद्रपुरात मेडिकल एजन्सी चालवतात. आपल्या मुलीच्या एमबीबीएस प्रवेशासाठी आणि मित्र शरद रणदिवे यांच्या मुलाच्या प्रवेशासाठी ते चांगल्या कॉलेजच्या शोधात होते. त्याच दरम्यान रणदिवे यांनी गुगलवर ऑनलाईन शोध घेऊन काउन्सेलर ओमप्रकाश राठोड याच्याशी संपर्क साधला होता.

राठोडने आपला ओळखीचा जोगेंदर सिंग उदयपूरचा असल्याचे सांगितले. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात कमी पैशात आणि सेटिंग करून तो थेट प्रवेश मिळवून देतो, असेही त्याने सांगितले. यापूर्वीही अनेकांचे प्रवेश करून दिल्याचे सांगून दोघांनी विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या विश्वासावर भोंबे आणि त्यांचे मित्र ७ सप्टेंबर २०२५ रोजी उदयपूरला निघाले आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी पॅसिफिक कॉलेज, उदयपूर येथे पोहोचले. ओमप्रकाश राठोडच्या सांगण्यावरून त्यांनी कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी शर्मा यांची भेट घेतली. अर्ज भरण्यास सांगून प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजच्या अकाउंटंटच्या बँक खात्यात ऑनलाईन १ लाख रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले.

काही दिवसांतच त्या कॉलेजमध्ये नंबर लागला नाही. तेव्हा भोंबे यांनी १ लाख रुपये परत मागितले आणि कॉलेजने ते १५ दिवसांत परत केले. त्यानंतर जोगेंदर सिंग याने सांगलीतील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च फॉर मॉडर्न मेडिसिन कॉलेजमध्ये आपली ओळख असल्याचे सांगितले. तिथे दोघांचाही एमबीबीएसला कन्फर्म प्रवेश करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. ओपन प्रवर्गातील मुलीसाठी २० लाख रुपये आणि ओव्हरहेड खर्च असे सांगून त्याने वेळोवेळी पैसे मागितले, असे तक्रारीत नमूद आहे.

भोंबे यांनी ८ नोव्हेंबर २०२५ पासून जोगेंदर सिंगने दिलेल्या युपीआय (UPI) आयडीवर आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवले. काही रक्कम मित्र शरद रणदिवे आणि भाऊ अमोल कोहळे यांच्या खात्यांमधून ऑनलाईन पाठवण्यात आली. वेगवेगळ्या बँक खात्यांशी लिंक असलेल्या युपीआयद्वारे एकूण ८ लाख ९८ हजार रुपये घेतले गेले, असा आरोप आहे.

इतके पैसे देऊनही प्रवेश मिळाला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा भोंबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी जोगेंदर सिंग आणि ओम प्रकाश राठोड यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(ड) सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ