बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:07 IST

कंपनीचा ई-मेल हॅक करून 34.50 लाखांची फसवणूक, नागपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

बुटीबोरीतील एका खासगी कंपनीचा ई-मेल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी 34.50 लाख रुपये लंपास केले. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कंपनीचा ई-मेल हॅक करून 34.50 लाखांची फसवणूक, नागपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नागपूर : एका खासगी कंपनीचा ई-मेल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी 34.50 लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मशीन खरेदीच्या व्यवहारात ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

अभय पांडे हे बुटीबोरी येथील एका खासगी कंपनीत एचआर मॅनेजर आहेत. त्यांच्या कंपनीला कामकाजासाठी वेळोवेळी मशीनची गरज असते. 21 ऑगस्टला कंपनीला रोल फॉर्मिंग मशीन खरेदी करायची होती. त्यासाठी पांडे यांनी डिवाईनमशिन्स प्रा. लि. यांच्याशी ई-मेलवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी 1.15 कोटी रुपये किमतीच्या मशीनची ऑर्डर दिली.

डिवाईस मशिन्स यांनी या व्यवहारातील 30 टक्के रक्कम आगाऊ पाठवायला सांगितली. ही रक्कम बँक ऑफ बडोदाच्या खात्यात जमा करायची होती, असे त्यांनी कळवले होते.

त्यानंतर 30 सप्टेंबरला डिवाईस मशिन्स यांच्या जुन्या ई-मेल थ्रेडवरूनच दुसरा ई-मेल आला. बँक खाते बदलल्यामुळे पैसे केनरा बँकेत पाठवावेत, असा उल्लेख त्या ई-मेलमध्ये होता. या ई-मेलवर विश्वास ठेवून पांडे यांनी 34.50 लाख रुपये आरटीजीएसने पाठवून दिले.

पैसे पाठवल्यानंतर पांडे यांच्या कंपनीने डिवाईस मशिन्स यांना नव्या खात्यात आरटीजीएस केल्याची माहिती दिली. तेव्हा त्या कंपनीच्या अधिकाऱ्याने केनरा बँकेत आपले खातेच नसल्याचे सांगितले. आपल्या कंपनीचा ई-मेल हॅक करून फसवणूक करण्यात आली आहे, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. कोणत्याही नव्या खात्यात पैसे जमा करायला आपण सांगितले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पांडे यांच्या लक्षात आले.

यानंतर पांडे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ज्या बँक खात्यात पैसे गेले, त्या खात्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ