सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
11:46 IST

डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, १० मिनिटांत होणारी झटपट रेसिपी

आंबट गोड चवीची डाळिंबाच्या दाण्यांची चटणी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने घरी करता येते.

डाळिंबाच्या चटणीने वाढवा जेवणाची चव, १० मिनिटांत होणारी झटपट रेसिपी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जेवणाच्या ताटात काहीतरी चमचमीत आणि चविष्ट असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी लोणचं, पापड, कोशिंबीर आणि चटणी असे अनेक पदार्थ तोंडी लावायला घेतले जातात. डाळ-भात, पराठे, वडापाव किंवा भजी यांच्यासोबत तर चटणी कायमच हवी असते.

पण रोज खोबऱ्याची किंवा शेंगदाण्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल, तर सोप्या पद्धतीने डाळिंबाच्या दाण्यांची चटणी करता येते. सध्या बाजारात डाळिंब मोठ्या प्रमाणावर आले आहेत. आंबट गोड चवीची ही चटणी कोणत्याही पदार्थासोबत खाता येते, म्हणजे जेवणात ती कशाबरोबरही चालते.

ही चटणी करण्यासाठी तासनतास किचनसमोर उभं राहावं लागत नाही. साहित्यही कमीच लागतं, त्यामुळे घरच्या घरी ती सहज तयार होते. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात लोह मिळायला मदत होते आणि आरोग्य सुधारतं. चला तर मग, ही रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य म्हणून डाळिंबाचे दाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिन्याची पाने, कांदा, टोमॅटो, मीठ आणि पाणी लागेल.

डाळिंबाच्या दाण्यांची चटणी करण्यासाठी सर्वात आधी डाळिंब स्वच्छ धुवून त्यातले दाणे काढून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून बारीक वाटा. चटणी करताना गरज वाटली तर थोडं पाणी घाला.

त्यानंतर त्यात कोथिंबीर, पुदिना, कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. झाली सोप्या पद्धतीने केलेली डाळिंबाच्या दाण्यांची चविष्ट चटणी तयार. हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडेल.

तयार केलेली चटणी फ्रिजमध्ये ठेवली तर ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहील. चटणी तिखट हवी असेल तर त्यात मिरचीचं प्रमाण वाढवता येईल, त्यामुळे पदार्थाची चव आणखी चांगली लागेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ