सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 09:26 IST

अनाहत सिंहची कमाल! आठ वेळच्या विश्वविजेतीला हरवून सिलिकॉन व्हॅली ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारताची १८ वर्षांची स्क्वॉशपटू अनाहत सिंह हिने अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ओपन स्क्वॉश स्पर्धेत नूर अल शेरबिनी हिचा सरळ गेममध्ये पराभव करून सेमीफायनल गाठली आहे.

अनाहत सिंहची कमाल! आठ वेळच्या विश्वविजेतीला हरवून सिलिकॉन व्हॅली ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतासाठी स्क्वॉशमधून एक आनंदाची बातमी आली आहे. क्रीडा क्षेत्रात भारताने अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंह हिने अमेरिकेत सुरू असलेल्या प्रतिष्ठित सिलिकॉन व्हॅली ओपन स्क्वॉश स्पर्धेत धमाकेदार खेळ करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा तिच्या कारकीर्दीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

अवघ्या १८ वर्षांच्या अनाहतने इजिप्तची दिग्गज खेळाडू नूर अल शेरबिनी हिचा पराभव केला. शेरबिनीने आठ वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावले आहे. एकूण १४३,५०० अमेरिकन डॉलर रकमेच्या या पीएसए गोल्ड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अनाहतने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या शेरबिनीविरुद्ध अनाहतने पूर्ण सामन्यात आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले. तिने हा सामना आरामात जिंकला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिने हा सामना ११-८, ११-८, ११-७ असा थेट जिंकला आणि अवघ्या ३० मिनिटांत संपवला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आठ वेळा विश्वविजेतीपद मिळवलेल्या खेळाडूला अशा प्रकारे हरवणे हे अनाहतच्या कारकीर्दीतले सर्वात मोठे यश मानले जात आहे. तिच्या या मोठ्या कामगिरीमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अवघ्या १८ वर्षांची भारतीय स्क्वॉशपटू अनाहत सध्या चर्चेत आली आहे. सामना जिंकल्यानंतर ती म्हणाली, "मी शेरबिनी यांचे सामने पाहतच मोठी झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत जे काही मिळवले, तेच सगळे मलाही माझ्या आयुष्यात मिळवायचे आहे. त्या जगातील सर्व स्क्वॉश खेळाडूंसाठी मोठा आदर्श आहेत." तिने असेही म्हटले की, "मी तिचा प्रत्येक सामना पाहत मोठी झाले आहे."

या वर्षाच्या सुरुवातीला अनाहतने वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या सिंगल्सचे विजेतेपद जिंकले होते. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिने इजिप्तचे १५ वर्षांचे वर्चस्व मोडून हा विक्रम केला.

चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही अनाहतने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत तिने दोन कांस्य पदके जिंकली आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ