सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:42 IST

आशियाई पॅरा गेम्समध्ये स्वाती चौधरीला तिरंदाजीत रौप्य पदक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कौतुक

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये उत्तर प्रदेशची स्वाती चौधरी हिने तिरंदाजीत रौप्य पदक जिंकले. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिचे अभिनंदन केले.

आशियाई पॅरा गेम्समध्ये स्वाती चौधरीला तिरंदाजीत रौप्य पदक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कौतुक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जपानमध्ये सध्या आशियाई पॅरा गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. त्या यादीत आता स्वाती चौधरी हिची भर पडली आहे. स्वातीने तिरंदाजीत रौप्य पदक जिंकले आहे.

स्वाती चौधरी मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिने रौप्य पदक जिंकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिचे कौतुक केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी स्वातीचे अभिनंदन केले आणि तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये महिलांच्या W1 तिरंदाजी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल उत्तर प्रदेशची कन्या स्वाती चौधरीचे मनापासून अभिनंदन. ही ऐतिहासिक कामगिरी भारतातील असंख्य तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ही पोस्ट 22 ऑक्टोबर 2026 रोजीची आहे.

स्वातीच्या या यशाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात क्रीडा क्षेत्रात काय बदल होत आहेत, याचीही चर्चा होत आहे. राज्यभरात खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे. प्रशिक्षणादरम्यान खेळाडूंना पैशांची अडचण येऊ नये, यासाठी सरकारतर्फे वेळेवर आर्थिक मदत केली जात असल्याचे म्हटले जाते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी भरीव रोख बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट सरकारी सेवेत घेऊन त्यांना सुरक्षिततेची आणि स्थैर्याची हमी दिली जात आहे.

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील क्रीडा क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. खेळाडूंच्या विकासासाठी राज्यभरात आधुनिक साधने तयार केली जात असून, त्यामुळे उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीचे क्रीडा केंद्र म्हणून पुढे येत आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्टेडियम, बहुउद्देशीय क्रीडा हॉल, स्विमिंग पूल आणि सिंथेटिक कोर्ट यांसारख्या उच्च दर्जाच्या सुविधा उभ्या केल्या जात आहेत. एक जनपद-एक खेल या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर मंजूर करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक क्रीडा प्रतिभेला व्यावसायिक प्रशिक्षण, दर्जेदार खेळ किट आणि लागणारे साहित्य मोफत दिले जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ