शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिवाळीत शेतकऱ्यांसाठी सरकारचे दोन मोठे निर्णय; 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना फायदा

दिवाळीत शेतकऱ्यांसाठी सरकारचे दोन मोठे निर्णय; 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना फायदा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

पीएम किसानचा २४ वा हफ्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी देण्याचा आणि पीक पाहणी ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीएम किसान योजनेचा २४ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने आज शेतकऱ्यांसाठी आणखी दोन अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा फायदा तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या दिवाळी सुरू आहे आणि सणाच्या काळातच हे निर्णय झाल्यामुळे शेतकऱ्यांना सणाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे, असे म्हटले जात आहे.

नेमके कोणते निर्णय घेतले, ते पाहू. पहिला निर्णय आदिवासी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी देण्याचा आहे, तर दुसरा निर्णय पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा आहे. या निर्णयांमुळे राज्यातील 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यात १ लाख ६० हजार आदिवासी शेतकरी आहेत.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली. आदिवासी समाज वर्षानुवर्षे जमीन कसत आहे, पण त्यांची नावे कागदोपत्री नाहीत, तसेच इतर योजनांमध्येही त्यांचा समावेश नाही, असे सांगण्यात आले आहे. शिवाय राज्यातील बऱ्याच भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे फॉर्मर आयडीही मिळालेले नाहीत. SPO नाही, अशा आदिवासींसाठी ही घोषणा आहे.

आदिवासींना हा फॉर्मर आयडी दिला जाईल. त्यासाठी त्यांनी फक्त 1 जानेवारी 2015 पूर्वीचा पुरावा दिला, तरी त्यांना ही सुविधा मिळणार आहे.

सरकारचा दुसरा निर्णय म्हणजे आता पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची रखडलेली पीक पाहणी आता करणे शक्य होणार आहे. पाहणी झाल्यावर या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन नुकसान भरपाई मिळणेही शक्य होणार आहे.

या निर्णयांची पार्श्वभूमीही सांगितली जात आहे. एल निनोमुळे फक्त महाराष्ट्रावरच नाही, तर संपूर्ण देशावर आणि जगावरही गंभीर परिणाम झाले आहेत. अन्नधान्याचा तुटवडा आणि इतर गोष्टींची कमतरता यामुळे महागाई बरीच वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर झाला आहे.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीही हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टीसारख्या परिस्थितीमुळे शेतकऱ्याने जे पेरले, ते सगळे त्याच्या पदरात पडलेले नाही आणि त्याचा फटका त्याला बसला आहे. अशा परिस्थितीत सरकारनेही योग्य ती पावले उचलणे फार महत्त्वाचे ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ