शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

राज्यात पुन्हा उष्णता वाढणार, हवामान विभागाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ तीव्र होण्याची शक्यता

राज्यात पुन्हा उष्णता वाढणार, हवामान विभागाचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळ तीव्र होण्याची शक्यता छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 शहर डेस्क

मध्यंतरीच्या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील हवामानात सध्या बदल होत आहेत. मध्यंतरी अनेक भागांत पाऊस झाला. यंदा राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि नुकत्याच झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीची चाहूल लागत आहे, पण त्याच वेळी हवामानाबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात अल निनो अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या खाडीत समुद्रातील तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. नॉर्थ इस्ट मॉन्सून अॅक्टिव्ह झाला आहे. आज जवळपास सर्व ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून या दोन्ही भागांत दुष्काळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोकणात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांत तापमान 37 अंशांपर्यंत वाढू शकते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 नोव्हेंबर रोजी जवळपास सर्व जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील. राज्यात पुढील काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याचे दाट संकेत आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

उष्णतेबरोबरच मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाचा मुद्दाही चिंतेचा बनला आहे. या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही दिवाळीत नागरिकांनी या निर्बंधांना हरताळ फासल्याचे चित्र दिसले. गेली काही वर्षे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा विषय चिंतेचा झाला आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषण वाढले आहे.

मुंबईचा कालचा AQI 107 होता, तर आज तो 102 नोंदवला गेला आहे. यात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हवा सर्वात प्रदूषित आहे. मुंबईतील हवा दिवसेंदिवस घातक बनत चालली आहे. सकाळी सर्वत्र धुके पाहायला मिळाले. एकीकडे राज्यातील इतर भागांत उष्णता वाढली आहे.

अशा वेळी भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. राज्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक आहेत, असे या इशाऱ्यात म्हटले आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यासह अनेक भागांत स्थिती अधिक भीषण आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला होता, पण आता कोरडे हवामान आणि वाढती उष्णता यांमुळे चिंता वाढली आहे.

#मुंबई#शहर#PT24#Civic#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ