अहान पांडे आणि शर्वरीच्या नव्या चित्रपटाचे नाव 'बेपरवाह', यशराज फिल्म्सची घोषणा
अली अब्बास जफर दिग्दर्शित हा रोमँटिक ॲक्शन-ड्रामा 26 मार्च 2027 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यशराज फिल्म्सने आज आपल्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'बेपरवाह' असे आहे. अहान पांडे आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमँटिक ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत, तर आदित्य चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
मेकर्सनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. 'बेपरवाह' हा चित्रपट 26 मार्च 2027 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून पाच महिने वाट पाहावी लागणार आहे. टायटल टीझर पोस्टरवरून चित्रपट रोमँटिक आणि इंटेन्स असल्याचे दिसते.
अहान पांडे हा 'सैयारा' चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला. त्या चित्रपटाने त्याला घराघरात पोहोचवले. आता 'सैयारा' नंतर तो थेट यशराजसारख्या मोठ्या बॅनरमध्ये एन्ट्री करत आहे. त्याच्यासोबत शर्वरी आहे, जिने आपल्या अभिनयाने याआधीच सगळ्यांना इम्प्रेस केले आहे. या दोघांची केमिस्ट्री कशी असेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. हा चित्रपट रोमँटिक ॲक्शन-ड्रामा असल्यामुळे प्रेक्षकांना प्रेमासोबत ॲक्शनही बघायला मिळणार आहे.
या चित्रपटाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचे यशराजमध्ये झालेले पुनरागमन. याआधी त्यांनी यशराज फिल्म्सला 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. आता बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा एकदा आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. मोठ्या स्केलचे चित्रपट बनवण्यात अली अब्बास जफर यांचा हातखंडा आहे आणि 'बेपरवाह' हाही त्याच पद्धतीचा भव्य चित्रपट असणार आहे.
या सिनेमासाठी आदित्य चोप्रा यांनी खूप मेहनत घेतली, असे म्हटले जात आहे. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट 2027 मधल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल.
अहान आणि शर्वरी ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 'बेपरवाह'चे पोस्टर आल्यापासूनच सोशल मीडियावर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचा टीझर आणि गाणीही येतील, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.