पोकोचा नवा Poco X8s स्मार्टफोन वियतनाममध्ये लाँच, 50MP कॅमेरा आणि 120Hz OLED डिस्प्ले
टेक कंपनी पोकोने वियतनाममध्ये मिड-रेंज सेगमेंटमधला Poco X8s हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Poco X8 सीरीजमधला हा पाचवा फोन आहे.
टेक कंपनी पोकोने वियतनाममध्ये Poco X8s हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या Poco X8 सीरीजमधला हा पाचवा स्मार्टफोन आहे. नव्या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत, ते आता सविस्तर पाहूया.
यापूर्वी कंपनीने याच सीरीजमध्ये Poco X8 Pro, X8 Pro Max, X8 आणि X8 Power हे स्मार्टफोन लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने याच सीरीजमध्ये आणखी एक नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
किमतीविषयी सांगायचे तर, Poco X8s दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यात 8GB+256GB आणि 12GB+512GB या व्हेरिअंट्सचा समावेश आहे. 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत VND 11,500,000 म्हणजेच सुमारे 42 हजार रुपये आहे. तर 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत VND 14,000,000 म्हणजेच सुमारे 51 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. पोकोने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे.
डिस्प्लेचा विचार केला तर, Poco X8s स्मार्टफोनमध्ये 6.35-इंचाचा 1.5K एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, पीक ब्राइटनेस 3,500 निट्सपर्यंत जातो आणि साइड बेजल्स 1.18mm ची आहे.
प्रोसेसरच्या बाबतीत, पोकोचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी आणि 12 जीबी एलपीडीडीआर5एक्स रॅम तसेच 256 जीबी आणि 512 जीबी UFS 4.0 स्टोरेज पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या पोको स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या हँडसेटमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो आणि तो IP68 रेटिंगसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 6,330mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 100W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, पोकोच्या या फोनमध्ये 5G, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची सुविधा आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये इन्फ्रारेड ब्लास्टर दिलेला असून तो मेटल फ्रेमसह येतो.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.