दुसऱ्यांकडून 'या' तीन वस्तू फुकट घेणे टाळा, वास्तुशास्त्राचा इशारा
रुमाल, मीठ आणि लोखंड या तीन वस्तू दुसऱ्याकडून फुकट घेऊ नयेत, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
घरात सुख-शांती नांदावी, पैसा टिकावा आणि भांडणतंटे होऊ नयेत, असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी काही लोक वास्तुशास्त्राचे नियम पाळतात. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घराची दिशा कुठे असावी एवढेच नाही. कोणत्या वस्तू कोणाकडून घ्याव्यात आणि कोणत्या घेऊ नयेत, हेही त्यात सांगितले आहे.
काही वस्तू दुसऱ्याकडून फुकट घेतल्या, तर त्याच्या घरची वाईट एनर्जी आपल्या घरात येते आणि घरात अडचणी वाढतात, असे सांगितले जाते. अशा तीन वस्तू आहेत: रुमाल, मीठ आणि लोखंड. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार या तिन्ही वस्तू मोफत घेऊ किंवा देऊ नयेत. दुसऱ्याचा वापरलेला रुमाल घेणे किंवा स्वतःचा रुमाल दुसऱ्याला भेट देणे टाळावे. मीठ मोफत घेऊ किंवा देऊ नये. लोखंडाच्या वस्तू मोफत घेण्याऐवजी त्यासाठी पैसे द्यावेत. आता या तिन्ही वस्तूंबद्दल एकेक करून पाहू.
सगळ्यात आधी रुमाल. कधीच कोणाचा वापरलेला रुमाल घेऊ नका. चाणक्य सांगतात की रुमाल देणे आणि घेणे, दोन्ही चुकीचे आहे. लोक रुमालाने घाम आणि अश्रू पुसतात. त्यामुळे त्या माणसाचे दुःख आणि त्याचे निगेटिव्ह विचार रुमालात असतात, असे मानले जाते. मित्राचा रुमाल फुकट घेतला, तर त्याचे प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ शकतात. आणि तुम्ही कोणाला रुमाल भेट दिला, तर मैत्रीत दुरावा येतो. म्हणून रुमाल नेहमी स्वतः विकत घ्यायचा असतो.
दुसरी वस्तू मीठ. मीठ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात लागते, पण वास्तूमध्ये मिठाचा संबंध शनी ग्रहाशी जोडला आहे. शनीला न्याय देणारा ग्रह मानतात. म्हणून कोणाकडूनही मीठ फुकट घेऊ नये आणि कोणाला फुकट देऊही नये. तसे केल्याने घरात पैशाची अडचण येते, कर्ज वाढते आणि घरात सारखे वाद होतात. कधी कधी शेजाऱ्याकडून मीठ मागावे लागते. अशा वेळी रिकाम्या हाताने घेऊ नका. त्याऐवजी थोडे पैसे किंवा एखादी वस्तू द्यावी.
तिसरी वस्तू लोखंड. लोखंड ही सुद्धा शनी देवाची धातू आहे. लोखंडाची वस्तू पैसे न देता घेणे अशुभ मानले जाते. म्हणून लोखंड नेहमी दुकानातून पैसे देऊनच घ्यावे. कोणी फुकट देत असेल, तरी त्याला 10-20 रुपये देऊन मगच ती वस्तू घ्या.
याशिवाय झाडू, तेल, पेन आणि घड्याळ या वस्तूही फुकट घेऊ नयेत, असे सांगतात. मात्र सगळ्यात जास्त महत्त्व रुमाल, मीठ आणि लोखंड या तीन वस्तूंना आहे. तुम्हाला पटत असेल तर हे नियम पाळा, नाही पटले तरी हरकत नाही. पण या छोट्या गोष्टी पाळल्याने घरात चांगली एनर्जी राहते, एवढे नक्की.